महत्मा फुले यांनी दुर्लक्षित समाजाला दिशा देण्याचे काम केले – अॅड.अभय आगरकर
अहमदनगर प्रतिनिधी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी त्या काळी अनेक विरोध पत्कारारुन जे समजोन्नत्तीचे काम केले ते आजही सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे. समाजातील अनिष्ठ रुढी,परंपरा यांना फाटा देत दुर्लक्षित समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांचा आदर्श आपण घेऊन समाजात काम केले पाहिजे.
महत्मा फुले यांना अपेक्षित असेच कार्य करुन वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याचे काम करण्याची गरज आहे.यासाठीच उत्सव समितीच्या माध्यमातून समाजाला उपयोगी असा सर्वरोग आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिरचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केेले.
महात्मा फुले जयंतीनिमित्त उत्सव समितीच्यावतीने आयोजित भव्य आरोग्य शिबीराचे उद्घाटन विशाल गणेश मंदिरचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ.सुदर्शन गोरे, दत्ता जाधव, धनंजय जाधव, बाळासाहेब भुजबळ, कोतवालीचे पोलिस निरिक्षक संपत शिंदे, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, परेश लोखंडे, विष्णू फुलसौंदर, संजय गारुडकर, संदिप भांबरकर, प्रा.सुनिल जाधव, निलेश चिपाडे, संदिप दातरंगे, सुनिल सुडके, अशोक तुपे, दिपक खेडकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पो.नि.संपत शिंदे, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, धनंजय जाधव यांनीही महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करुन उत्सव समिती नेहमीच कार्यरत राहून काम करेल, असे सांगितले.
शिबीर यशस्वीतेसाठी भारत जाधव, विकी कानडे, श्रीकांत आंबेकर, गणपत चेडे, अजय गाडळकर, कमलेश जंजाळे, अक्षय चेडे, सुमित पटवेकर, मंदार लोखंडे, कपिल जाधव आदि प्रयत्नशील होते.या शिबीरात डॉ.श्रीधर बधे, डॉ.संतोष पालवे, डॉ.विशाल खराडे, डॉ.स्नेहा खराडे, डॉ.राहुल हजारे, डॉ.संदिप नगरे, डॉ.निनाद गाडेकर, डॉ.अमोल जाधव, डॉ.मनिष खरपुडे, डॉ.अभिजित शिंदे, डॉ.अभिजित बोरुडे, डॉ.केतन गोरे, डॉ.शाम गायकवाड आदिंनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबीरात असंख्य रुग्णांनी या सर्वरोग तपासणी शिबीराचा लाभ घेतला.या शिबीरात मेट्रो पोलिस लॅबच्यावतीने मोफत रक्ततपासणी, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्यावतीने मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात दत्ता जाधव यांनी उत्सव समितीच्यावतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.डॉ.सुदर्शन गोरे यांनी या आरोग्य शिबीरासाठी विशेष प्रयत्न केले.सूत्रसंचालन प्रा.स्वाती सुडके यांनी केले तर आभार भारत जाधव यांनी मानले.