महात्मा फुले यांचा मोफत शिक्षणाचा वारसा पुढे चालवणार … नितीन भुतारे

0
94

अहमदनगर प्रतिनिधी – महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने ११ एप्रिल रोजी मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी अभिवादन केले.त्यांच्या बरोबर ईतर क्षेत्रातील श्रीराम शिंदे, प्रसाद बेरड ,संकेत व्यवहारे, संतोष साळवे, प्रशांत साके, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना नितीन भुतारे म्हणाले आजही आम्ही महात्मा फुले यांच्या विचारांनी चालतो.समाजात जनमानसात काम करतांना सामाजिक कार्याची आवड हि फुलेंच्या विचारांमुळे निर्माण झाली.आजही चांगले दर्जेदार शालेय शिक्षण हे या देशात, राज्यांत घेण्यासाठी लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यामुळे गोरगरीब विध्यार्थी या शिक्षणासून वंचीत राहतात.

महात्मा फुले यांचा मोफत शिक्षणाचा वारसा पुढे चालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे नितीन भुतारे यांनी या वेळी सांगितले.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त यावेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here