अहमदनगर प्रतिनिधी – महानगरपालिकेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आणि पर्यटन दिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या ऐतिहासिक नगर दर्शन बस सेवा उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत असून शनिवार दिनांक २ ऑक्टोबर आणि रविवार दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी एकूण ७० नागरिकांनी नगर दर्शन सहलीचा आंनद लुटला.अशी माहिती महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे यांनी दिली.

महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे,आयुक्त श्री.शंकर गोरे,उपमहापौर श्री.गणेश भोसले,स्थायी समिती सभापती श्री अविनाश घुले, सभागृह नेते श्री.अशोक बडे,महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.पुष्पाताई बोरुडे,उपसभापती सौ.मीनाताई चोपडा,अतिरिक्त आयुक्त डॉ.श्री.प्रदीप पठारे,उपायुक्त (कर ) श्री.यशवंत डांगे सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या वतीने सहलीत सहभागी नागरिकांना शुभेच्छा देऊन शिवसेना माजी शहर प्रमुख श्री.संभाजी कदम यांच्या हस्ते नगर दर्शन बस सोडण्यात आली.
यावेळी बोलताना संभाजी कदम म्हणाले की आपल्या शहरातील प्रत्येक ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यावर त्या स्थळांचे ऐतिहासिक महत्व समजेल आणि माहिती मिळाल्यावर प्रत्येकाला आपल्या शहराची नव्याने ओळख होऊन आपल्या शहराचा अभिमान वाटेल यासाठी नगर दर्शन उपक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी नाव नोंदणी करावी.
प्रत्येक नागरिकांनी आपला इतिहास जतन व्हावा यासाठी आपल्या मुलांना इतिहासाची,शहरातील ऐतिहासिक वास्तूंची,स्थळांची ओळख करून द्यावी.या उपक्रमास मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहून आपण मा.महापौर,मा.आयुक्त आणि सर्व पदाधिकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून बस क्षमता वाढवून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू.
आयुक्त श्री.शंकर गोरे यांनी सांगितले की शहराच्या दैनंदिन सुविधा देत असताना विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक, सामाजिक उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार आहेत.या सर्व उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
महापालिकेच्या जुन्या कार्यालया जवळील श्री राधाकृष्ण मंदिराजवळून निघालेल्या बस मधील पर्यटकांनी
ग्राम देवता श्री विशाल गणपती, मेहराबाद, आनंदधाम,फरहाबक्ष महाल,रणगाडा संग्रहालय,भुईकोट किल्ला,चांदबीबी महाल,ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या ठिकाणी भेट दिली.
सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून अहमदनगर हेरिटेज वॉकचे प्रमुख भूषण देशमुख सह अमोल बारस्कर,पंकज मेहेर,सतीश गुगळे,ठाकूर, परदेशी,स्वयंम बास्कर यांनी परिश्रम घेतले.
आत्ता पर्यंत या उपक्रमात शहरातून ५०० च्या वर नागरिकांनी नाव नोंदणी केली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार नियोजन करण्यात येत असून नागरिकांनी अधिक माहिती साठी ९८५०१४६६११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धी अधिकारी आणि नगर दर्शन उपक्रम समन्वयक शशिकांत नजान यांनी केले आहे.
नगर दर्शन उपक्रम यशस्वी करण्यासाठी जल अभियंता तथा वाहन विभाग प्रमुख परिमल निकम,बस व्यवस्थापक रावसाहेब काकडे,दक्षता पथक सहायक नंदकुमार नेमाणे,सूर्यभान देवघडे तसेच राजेश लयचेट्टी,किशोर कानडे,वाहन विभागातील उमेश आहेर,अशोक कांबळे यांचे सहकार्य लाभले.
नगर दर्शन सहलीत सहभागी झालेल्या माळीवाडा परिसरातील बाळ गोपालांनी पैसे जमा करून बस साठी हार खरेदी करून पूजा केली.