महापालिकेच्या वतीने मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
शहरात ठीक-ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा
नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीनिमित्त रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व सावेडीतील महात्मा ज्योतिबा फुले शाळा हे दोन आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली असून या ठिकाणी मतदारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रीय पाठशाळा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. मा.उपमहापौर गणेश भोसले यांनी आयटीआय कॉलेजमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके दुचाकी वरून मतदान केंद्रांना भेटी देत माहिती घेत होते. शहरात ठीक ठिकाणी मतदान केंद्रावर मोठी गर्दी पहावयास मिळत होती. महापालिकेच्या वतीने मतदारांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका प्रशासन मतदान जास्तीत जास्त घडावे यासाठी प्रयत्न करत होते.