महापुरुषांच्या लाभलेल्या इतिहासाची ज्योत कायमस्वरूपी प्रज्वलित राहील – आ. संग्राम जगताप
नगर : महाराष्ट्राची भूमी ही महापुरुषाच्या विचाराने पावन झाले असून आपण सर्वजण त्यांचे विचार अंगीकारत असल्यामुळे आपल्यामध्ये प्रगल्भता आली असून काम करण्याची ऊर्जा मिळत आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना स्त्री शिक्षणाची दारे खुली करून दिली असल्यामुळे महिलांसाठी वेगळे स्थान निर्माण झाले आहे महापुरुषांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे नगर शहरामध्ये महापुरुषांचे पूर्ण कृती पुतळे उभे राहावे ही नगरकरांची इच्छा होती ती पूर्ण करण्याचे काम सुरू आहे माळीवाडा वेस येथे लवकरच महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्ण कृती पुतळा उभा राहणार आहे त्यामुळे आपल्याला लाभलेल्या इतिहासाची ज्योत कायमस्वरूपी प्रज्वलित राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जनमानसात पोहोचविण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळीवाडा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप समवेत माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्रा. माणिकराव विधाते, अभिजीत खोसे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुमित कुलकर्णी, इंजिनीयर केतन क्षीरसागर, सुरेश आंबेकर, अमित खामकर, युवराज शिंदे, रणजीत सत्रे, ज्ञानेश्वर रासकर, राहुल दातरंगे आदी उपस्थित होते.
- Advertisement -