महापौर रोहिणीताई शेंडगे व नगरसेवक सचिन शिंदे यांच्‍या प्रयत्‍नातून प्र.क्र. ८ मध्‍ये बंद पाईप गटर कामाचा शुभारंभ.

0
94

कल्‍याण रोड परिसर लवकरच टॅकरमुक्‍त होणार – मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

नगर शहराच्‍या विकासा बरोबर कल्‍याण रोड परिसराचे अनेक वर्षापासूनचे विविध प्रश्‍न मार्गी लावून विकसीत उपनगर निर्माण करणार आहे. या भागामध्‍ये बंद पाईप गटर ,ड्रेनेज लाईन , पाणी प्रश्‍न, रस्‍त्‍याचे प्रश्‍न व वीज प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी उपाय योजना सुरू केल्‍या आहेत. या भागाचा पाणी प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी गणेश नगर भागातील पाण्‍याच्‍या टाकीखाली साडेतीन लाख लिटरचा संपवेलचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होवून या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्‍यामुळे हा भाग लवकरच टॅकरमुक्‍त होईल.आम्‍ही दिलेले विकासाचे शब्‍द पाळत आहोत.असे प्रतिपादन मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी केले.

महापौर रोहिणीताई शेंडगे व नगरसेवक सचिन शिंदे यांच्‍या प्रयत्‍नातून कल्‍याण रोड भागातील प्रभाग क्र.८ मध्‍ये शिंदे फिटनेस ते मळगंगा देवी मंदिर ते दगडे सर यांच्‍या घरापर्यत ६०० एमएम बंद पाईप गटर करणे कामाचा शुभारंभ मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला.

यावेळी महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती मा.सौ.पुष्‍पाताई बोरूडे, माजी महापौर मा.श्री.भगवान फुलसौंदर , माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक शाम नळकांडे, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दत्‍ता जाधव , संतोष गेणाप्‍पा, पारूनाथ ढोकळे,  श्रीनिवास इपलपेल्‍ली, रमेश सुरम, सुधाकर बोल्‍ली, नरेश कुरापट्टी, निलेश शिरसुल, गणेश लयचेट्टी, संतोष पळसकर, शंकर पाटील, सुदाम मडके, संतोष शिंदे, उत्‍तम राजळे, पद्माकर चोपडे, सतिष परदेशी, दिनकर आघाव, अविनाश मांढरे, उंडेसर, अमोल शिंदे, पोपट चव्‍हाण, सुनंदा इपलपेल्‍ली, कोमल मच्‍चा, उषा शिंदे शांता मंजूळे, लाटे, पठाणभाभी, श्रीमती मुळे, बिडकर आदी उपस्थित होते.

माजी शहर प्रमुख संभाजी कदम म्‍हणाले की, राज्‍य सरकार व मनपाच्‍या माध्‍यमातून शहर विकासाला चालणा देण्‍यात येणार आहे. प्रभाग ८ व प्रभाग १५ मध्‍ये एकाच विचाराचे नगरसेवक निवडून दिले आहेत. त्‍यामुळे या भागाच्‍या विकासाला गती मिळाली आहे. पुढील ४० वर्षाच्‍या विकासाचा कृती आराखडा तयार टप्‍प्‍या टप्‍प्‍याने विकास कामे मार्गी लागणार आहे. आमच्‍या शिवसेनेचे नगरसेवक विकास कामे करण्‍यास कटीबध्‍द आहे.

नगरसेवक सचिन शिंदे म्‍हणाले की, कल्‍याण रोड परिसराच्‍या विकास कामामुळे नागरी वसाहती वाढत आहे. त्‍यांना मुलभूत सुविधा देणे आमचे कर्तव्‍य आहे. याभागामध्‍ये पावसाचे पाणी वाहून जाण्‍यासाठी बंद पाईप गटरची कामे मार्गी लागणे महत्‍वाचे आहे या दृष्टिकोनातून विविध कामे मार्गी लावली आहेत. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न अंतिम टप्‍प्‍यात आला असून हाही प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल. याच बरोबर या भागातील रस्‍त्‍याची कामे मार्गी लावण्‍यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करून दिला जाणार आहे. प्रभाग क्र.८ मध्‍ये शिंदे फिटनेस ते मळगंगा देवी मंदिर ते दगडे सर यांच्‍या घरापर्यत ६०० एमएम बंद पाईप गटरीचे काम पूर्ण झाल्‍यानंतर या परिसरातील सांडपाण्‍याचा व पावसाच्‍यापाण्‍याचा प्रश्‍न मार्गी लागून नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न मार्गी लागेल असे ते म्‍हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here