महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्याकडून पॅचिंग कामाची पाहणी

0
82

लवकरच शहरातील खड्डयांचे पॅचिंग होणार – महापौर सौ.शेंडगे

अहमदनगर प्रतिनिधी – अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नगर शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत वेळोवेळी नगरसेवक, सामाजिक संस्था, नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या.त्यावर तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्यात येत होते.परंतु पावसाळ्याचे दिवस असल्याने पुन्हा खड्डे होत होती. आता पावसाने विश्रांती घेतली असल्याने नगर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आधुनिक व चांगल्या पद्धतीने बुजविण्यात येणार आहे.याबाबत आपण स्वत: या कामांवर लक्ष ठेवून असून काही दिवसांतच नगरमधील सर्व रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंग करण्यात येतील, असे महापौर रोहिणी शेंडगे यांनी पॅचिंगच्या पाहणीवेळी सांगितले.

महानगरपालिकेच्यावतीने रस्त्यांतील खड्ड्यांच्या पॅचिंग कामाला न्यू आर्टस् कॉलेजपासून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पाहणी करुन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी सुचना दिल्या. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, इंजि.सुरेश इथापे उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, शहरातील खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत आपण आपण तातडीने अधिकार्‍यांची बैठक घेऊन हे खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहे. आता या कामाला ही सुरुवात झाली आहे. परंतु शहरातील रस्त्यांची कामे होण्यासाठी तसेच काही महत्वाचे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे होण्यासाठी आपण स्वत: नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली आहे, त्यास ना.शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढील काळात शहरातील रस्ते चांगल्या पद्धतीने तयार होतील, असे सांगितले.

याप्रसंगी सुरेश इथापे यांनी सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. या कामाचा शुभारंभ लालटाकी पासून करण्यात येऊन काही दिवसातच शहरातील इतर भागातील हे पॅचिंगचे कामे करण्यात येतील. सुरुवातीला खोदून, त्यात खडी टाकून त्यानंतर हॉटमिक्सींग टाकण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात पाणीचा निचरा होत नाही, त्या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्याचे व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यामुळे पुन्हा खड्डा होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे सांगितले.

शहरातील सर्वच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असतांना आता पॅचिंग कामास सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here