महाराष्ट्रातील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठाण हिंदस्थानचा निषेध

0
84

रजा अकादमी आणि दंगली घडवणाऱ्या संघटनांना कायमस्वरूपी बंदी घालावी  

अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर

आसाम येथील त्रिपुरामधील कथित घटनेवर महाराष्ट्रामध्ये काही धर्मांध समाजकंटकांनी हिंदूंची दुकाने फोडून जाळपोळ केली मारहाण केली.त्या घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यात आला.त्याचबरोबर या धर्मांध लोकांवर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलावीत.अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नायब तहसीलदार आर.जी. दिवाण यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी देविदास मुदगल,भूषण झारखंडे,तानाजी देवकर,महेश निकम, दिनेश जोशी,संतोष पठाडे,रवी चंवडके,गणेश चोपडे, कृष्णा गिलचे,राहुल म्हसे,केतन चाकणकर आदी उपस्थित होते.

कथित घटनेची शहानिशा न करता महाराष्ट्रातील अमरावती,नांदेड,परभणी,मालेगाव येथे धर्मांधांनी जी कृत्ये केली त्या घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र भर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने निषेध व्यक्त करीत आहोत.

छत्रपतींच्या स्वराज्यात कुठल्याही कारणाने हे समाज कंटक उपद्रव निर्माण करीत असतील.तर त्यांचा बंदोबस्त होणे तेवढेच गरजेचे आहे.यावर सरकारने योग्य ती पावले उचलावीत.या घटनेला जबाबदार असलेली रजा अकादमी आणि जे कोणी संघटना असतील त्यांच्यावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालावी.अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here