अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने कृषिभूषण सबाजीराव गायकवाड यांना पाचगणी येथे कोव्हिडं वॉरीयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यासाठी गायकवाड यांनी २५ जणांची एक टीम नेमली होती.दिवसभर येणारे कॉल त्या सर्व टीमने हँडल करायचे अशी ही सेवा कोरोणा काळात दोन महिने सुरू होती त्यामधून संपूर्ण भारतातील रुग्णांना फायदा झाला व आता आम्हाला कुठलाही प्रचार करण्याची गरज नाही जे कोरोणा रुग्ण बरे होत आहेत तीच समाजामध्ये प्रचार-प्रसार करत आहेत.
त्यामूळे कृषिभूषण सबाजीराव गायकवाड यांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र जनरललिस्ट फाउंडेशन च्या वतीने कोव्हिड वॉरियर्स पुरस्कार देताना मा.मंत्री अण्णासाहेब डांगे, वाई विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या सौ.अर्चनाताई मकरंद पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पाचगणीच्या नक्षराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले या पुरस्काराबद्दल संभाजीराव गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.