राज ठाकरेंच्या भाषणाचे जाेरदार पडसाद
धार्मिकता व हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठी पुढाकार घेऊ – सुमित वर्मा
अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर मनसे आक्रमक झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत नगर जिल्ह्यामध्ये भोंगे वाटप करण्यात आले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरासह नगर तालुक्यातील काही धार्मिक स्थळांना भाेंगे वाटप केले. तब्बल १८ भाेंगे वाटले,धार्मिकता व हिंदु संस्कृतीचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच पुढाकार घेईन,आतापर्यंत ४० च्यावर भाेंगे वाटप केले असून,यापुढे जिल्हाभर भोंगे वाटपाचा कार्यक्रम राबविणार आहोत असे सुमित वर्मा म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर शहर व तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांना भोंग्याचे वाटप करताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा, तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संकेत जरे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या पक्ष मेळाव्यात मशिदींवरील भाेंग्याबाबत वक्तव्य केले होते.मशिदींसमाेर दुप्पट आवाजाने हनुमान चाळीसा वाजवू,असा इशारा दिला हाेता.राज ठाकरे यांच्या या भाषणाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत.
मनसेमधील हिंदूत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.अहमदनगर देखील राज ठाकरे यांच्या या भाषणाचे पडसाद उमटले आहेत.मनसेने नगरमध्ये आक्रमक भूमिका घेत हिंदूंच्या धार्मिक स्थळांसाठी भाेंगे वाटप सुरू केले.