महाराष्ट्र परिचर्या परिषद निवडणूक २०२१ च्या अहमदनगर जिल्हा रुग्णालय अधिपरिचारीका,अ.क्र.१ च्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुरेखा आंधळे यांचे मनोगत व आव्हाहन….

0
115

अहमदनगर – महाराष्ट्र परिचर्या परिषद सर्व महाराष्ट्रातील परिचारिकांची हक्काची संस्था जिथे प्रत्येक परिचारिका आपली नोंदणी करते.त्याच परिषदेची निवडणूक होत आहे.या ठिकाणी निवडून जाणारी व्यक्ती परिचारिका साठी सदैव हजर असणारी,अन्याया विरोधात लढणारी असावी.केवळ स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारांचा गैरवापर करणारे नसावे.

त्यामुळे सर्व परिचारिका बंधू-भगिनींना विनंती करते यापूर्वी परिचर्या परिषद निवडून गेले.त्यांनी फक्त स्वतःच्या संस्था निर्माण केल्या कॉलेज काढले.परंतु परिचारिका साठी एकही गोष्ट केली नाही.मी आपणास सुरेखा आंधळे व संदीप साबळे यांना मतदान करावे असे आवाहन करत आहे.

याचे कारण मागील चोवीस वर्षात परिचारिका साठी मी सदैव आंदोलन उभे करून परिचारिकांचे वर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे.आत्ताचे ताजे उदाहरण जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे परिचारिकावर झालेल्या कारवाई विरोधात आक्रमक पणे उभा राहून अकरा दिवस आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

तसेच यापूर्वी अनेक आंदोलने केली.न्यायालयीन मार्गाने प्रमोशनचा तिडा सोडवण्यासाठी प्रयत्न केले.वेगवेगळ्या आरोग्य मंत्र्यांच्या भेटी घेऊन सेवा नियमीत सारखे प्रश्न मार्गी लावले हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.

परंतु अहमदनगर येथे इतके मोठे आंदोलन असताना जे आज वर्षानुवर्ष परिचारिकांच्या संस्थेवर आहे त्यांनी साधी भेट घेण्याची सुद्धा तसदी घेतली नाही.त्यामुळे आपण ठरवा स्वतःचे खिसे भरणाऱ्यांना मतदान करायचे की परिचारिका साठी लढणार्‍यांना मतदान करायचे? निर्णय सर्वस्वी आपला आहे.

माझी सर्व संस्था चालकांना विनंती आहे की आपण आपला आणि आपल्या विद्यार्थ्यांचे मतदान योग्य व्यक्तीला कसे होईल याकडे भर द्यावा. कारण संस्थाचालक म्हणून आपण परिचारिका व्यवसायाचे आधारस्तंभ आहात.

श्रीमती सुरेखा आंधळे
अहमदनगर जिल्हा रुग्णालय अधिपरिचारीका
अ.क्र.१ च्या अधिकृत उमेदवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here