नेवासा फाटा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग चित्रपट साहित्य कला प्रदेश संघटक तथा सचिव पदी नेवासाफाटा येथील चंद्रशेखर कडू पाटील यांची निवड प्रदेशाध्यक्षा विद्या कदम यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.
काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर कडु हे काम पहात होते त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या वर राज्य संघटक तथा सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांचे काँग्रेस प्रति असलेली विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्य करत व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी चंद्रशेखर कडू पाटील यांनी सांगितले
अल्पावधीतच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी कला व सांस्कृतिक विभागाच्या सचिवपदी तसेच संघटक पदी निवड केल्यामुळे चंद्रशेखर कडू पाटील यांचे पक्षाचे वरीष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमदार लहू कानडे, संभाजी राव फाटके, कॉ बाबा अरगडे, अध्यक्ष बाळासाहेब साळुंके. जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,नेवासा तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे,शहराध्यक्ष रंजन दादा जाधव यांनी अभिनंदन केले आहे.