महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब व मनाची गदा पै. भाग्यश्री फंड हिने मिळविला तर ५५ किलो वजन गटात पै. धनश्री फंड हिने मिळवले सुवर्णपदक  

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब व मानाची गदा पै. भाग्यश्री फंड हिने मिळविला तर ५५ किलो वजन गटात पै. धनश्री फंड हिने मिळवले सुवर्णपदक  

नगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने दिनांक 06 ते 07 एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर येथे वरिष्ठ महीला राज्य अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेत अहमदनगर ची महीला कुस्तीगीर व प्रथम महीला महाराष्ट्र केसरी पै. भाग्यश्री फंड ने  महाराष्ट्र केसरी चा किताब व मानाची गदा जिंकून दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाली. तसेच 55 किलो वजन गटात पै. धनश्री फंड ने सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याबद्दल अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संचाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी पै. शिवाजी शिर्के, पै. अर्जुन (देवा) शेळके, पै. शिवाजी चव्हाण, उप महाराष्ट्र केसरी बबन काशीद, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, उप महाराष्ट्र केसरी बापू थिटे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, पै. पांडुरंग गुंजाळ, पै. मधुकर उचाळे, पै. रवींद्र वाघ, सह सचिव पै. प्रवीण घुले, पै. शिवाजी कराळे, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. युवराज करंजुले, पै. उमेश भागानगरे, पै. नितीन काकडे, पै. शंकर खोसे, पै. प्रमोद गोडसे, पै. संदिप कावरे, पै. धनंजय खर्से, पै. अफजल शेख, पै. अतुल कावळे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!