महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने “कोरोना योद्धा”सन्मान सोहळा संपन्न

0
99

संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान – पोपटराव पवार     

 

अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर

भारतीय संस्कृती महान आहे.या देशात मातीवर प्रेम करणारी माणसं आहेत.छ.शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या आदर्शवादी व्यक्तींची प्रेरणा घेऊन मुलांनी देशसेवेकडे वळावे.वनसंपदा,भूसंपादन, जलसंपदा या नैसर्गिक संपत्तीचा ठेवा वाचविण्यासाठी प्रयत्न करावे.विद्यार्थी र्निर्व्यसनी व्हावे.यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.

तसेच विद्यार्थांमधे राष्ट्रप्रेम व पर्यावरण प्रेमाची भावना निर्माण व्हावी.यासाठी शिक्षकांनी संस्कारक्षम शिक्षण द्यावे.कोरोनाच्या काळात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे.शाळा बंद होत्या.परंतु शिक्षकांनी शासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून कोरोना योद्धा हा सन्मान प्राप्त केला आहे.असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच मागील दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातलेले आहे.कोरोना कालावधीत खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अनेक ठिकाणी कोरोना ड्युटी केल्या आहेत.

शहरातील २०० शिक्षकांनी या कठीण कालावधीत कोरोना ड्युटी करून मानवसेवा व देशसेवेचे कार्य केले.त्याबद्दल पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते “कोरोना योद्धा सन्मान” म्हणून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.तसेच कोरोना कालावधीत कर्तव्य पार पाडत असताना मृत्यु झालेल्या शिक्षकांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी महासंघाचे राज्य अध्यक्ष कांता तुंगार,मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, महासंघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ ठोंबरे,जिल्हा सचिव विठ्ठल उरमुडे,नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव खालकर,संस्थेचे खजिनदार नगरसेवक मदन आढाव, महासंघाचे पदाधिकारी शेखर उंडे,अन्सार शेख,विठ्ठलप्रसाद तिवारी,सुभाष येवले,सुरेश शेवाळे,नंदकुमार हंबर्डे, आदिनाथ घुगरकर,सौ.मंदा हांडे,श्रीराम खाडे,अतुल सारसर, चंद्रशेखर देशपांडे,प्रफुल्ल मुळे,भगवान जाधव,सुरज घाटविसावे,संजय चौरे आदी उपस्थित होते.

मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार म्हणाले की,शिक्षकांनी कोरोना महामारी च्या काळात समाजाच्या भल्या करिता शासनाने दिलेले काम केले आहे.कोरोनाच्या काळात शिक्षकांनी चेकनाका तसेच रेशनिंगचे काम केले आहे.अनेक अडचणीच्या काळातही शिक्षक समाजासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या सहकार्यासाठी काम करत होता.म्हणून शिक्षकांचा गौरव होणे गरजेचे आहे.

महासंघाचे राज्य अध्यक्ष कांता तुंगार म्हणाले की,गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी चांगले काम केले आहे.सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाही जिवाची पर्वा न करता शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हणून जबाबदारीने काम केले आहे.तसे पाहता शिक्षकांना जनगणना व निवडणूक सोडून कोणतेही काम देऊ नये.असा कायदा असतानाही प्रशासनाचा आदेश आला.म्हणून शिक्षकांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या शासनाच्या मोहिमेत कोरोना काळात घरोघरी जाऊन जनजागृतीचे कार्य केले आहे.

या प्राथमिक शिक्षकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी.यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने “कोरोना योद्धा सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

प्रास्ताविक रघुनाथ ठोंबरे यांनी केले.या कार्यक्रमात राघवेंद्र स्वामी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.अहमदनगर शहर सचिव विठ्ठलप्रसाद तिवारी यांनी सूत्रसंचालन केले.आभार शहर अध्यक्ष सुभाष येवले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here