महावीर जयंतीच्या मुहूर्तावर पारनेर तालुका जैन महासंघाची कार्यकारणी जाहीर.
पारनेर तालुका जैन महासंघाचे अध्यक्ष राजेश भंडारी, उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट व प्रदीप गांधी यांची निवड.
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील देवी भोईरे गावात महावीर जयंती ही तालुक्यात मागील २३ वर्षा पासुन एक तालुका एक महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी देवी भोईरे येथे साजरी करण्यात आली व पुढीलवर्षीची महावीर जयंती खडकवाडी या ठिकाणी होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली. महावीर जयंती या दिवसाचे औचित्य साधून पारनेर तालुका जैन महासंघाचे पहिले संस्थापक अध्यक्ष कुंदन काका साकला यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ४६ गावाचे जैन संघटनेचे अध्यक्ष व सर्व जैन बांधव एकत्र येऊन बैठक घेण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी राजेश संतोष भंडारी, उपाध्यक्षपदी प्रसाद कर्नावट, उपाध्यक्ष प्रदीप गांधी, सचिव सचिन कुंदनलाल साखला, खजिनदार विलास कटारिया, सरचिटणीस पंकज पिपाडा, समन्वयक यश लोढा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पारनेर तालुक्यातील सर्व ४६ गावाचे जैन संघटनेचा अध्यक्ष उपस्थित होते सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे संस्थापक अध्यक्ष कुंदन काका साकला यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश भंडारी, उपाध्यक्ष प्रसाद कर्नाटक व प्रदीप गांधी यांनी पारनेर तालुका जैन महासंघाच्या बिनविरोध निवड केल्याबद्दल पारनेर तालुक्यातील सर्व गावातील जैन संघटनेच्या आभार मानत चांगले कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली.
- Advertisement -