शोधकार्याला पावसाचा ठरतोय अडथळा
पाचव्या दिवशीही शोधकार्य सुरुच
अंमळनेर प्रतिनिधी – सुनिल आढाव
अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी २४ सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी पाच ते सहाच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दरीत आत्महत्या केली.परंतु मंगळवारी रात्री त्यांची डेथ बॉडी मिळून आलेली नव्हती.यामुळे पाच दिवसांपासून आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकांची डेथ बॉडी गेली कुठे ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवाशी असलेले आत्महत्या केलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव येथेच कार्यरत होते.त्यांनी पाटोदा तालुक्यात घेऊन सौताडा येथील दरीत येऊन आत्महत्या कशामुळे केली ? कि कोणाच्या जाचास कंटाळून केली ? कि त्यांना कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडले या सर्व बाबी तपासून या प्रकरणाचा बारकाईने तपास हा पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे पाच दिवसांपासून करत आहेत.
मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांचे प्रेत हे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सापडले नव्हते.सौताडा येथील दरी मोठ्या प्रमाणात खोल आहे त्यातच रिमझिम पाऊस देखील पडत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढला आहे.यामुळे ग्रामसेवकांची डेथ बॉडी कधी सापडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांनी सौताडा दरीत आत्महत्या करुन पाच दिवस लोटले आहेत.परंतु अद्यापही त्यांची बॉडी सापडली नाही यामुळे हि शोध मोहीम अशीच सुरु रहाणार असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील व सौताडा बिट अंमलदार सुनिल सोनवणे यांनी दिली .
————
मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांनी आत्महत्या केलेल्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दरीत गेल्या पाच दिवसांपासून पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,पोलीस कर्मचारी सुनिल सोनवणे ,पाटोदा तहसीलदार सुनिल ढाकणे ,मंडळ अधिकारी बडे ,तसेच सौताडा येथील युवक शोध घेत आहेत परंतु ग्रामसेवकांची डेथ बॉडी पाण्याच्या बाहेर अद्यापही आलेली नसल्यामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे .