माजी मंत्री सदाभाऊ खोत व सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांची गावगाड्यासह विविध विषयावर चर्चा

0
88

बीड प्रतिनिधी – राज्याच्या राजकारणात काम करत असताना शेतीशी व शेतकर्‍याची जाण असणारा व शेतकर्‍याच्या हितासाठी राज्यात अनेक आंदोलन उभा करून बळीराजाला न्याय मिळवून देणारे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत, तर सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यभर गावगाड्याच्या हितासाठी काम करणारे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे या दोन नेत्याची आष्टीत दोन तास विविध विषयांवर चर्चा झाली. या दोन नेत्याच्या चर्चा आणि भेटी यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.

माजीमंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यासाठी झटणारे व प्रश्न तडीस लावणारे नेते आहेत. तर त्यानी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या आष्टी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन तब्बल दोन तास विविध विषयांवर चर्चा केली. दत्ताभाऊ काकडे यांच्या कामाचे देखील कौतुक करून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सक्षम करून गावागाडा चालवत असताना सरपंचाच्या हितासाठी व लोकाभिमुख कामासाठी योगदान देणाऱ्या परिषदेचे उल्लेखनीय कार्य असल्याचे सांगितले.

त्याच बरोबर माजी मंत्री खोत हे सर्व सामान्य जनतेची जाण असणारे व शेतकर्‍याचे प्रश्न पोटतीडीकीने मांडुन तडीस नेणारे नेते आहेत. आता या दोन तास काय चर्चा झाली असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात काकडे यांना विचारले असता सदाभाऊ यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे ग्रामीण भागाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे माझ्या घरची भेट ही सदिच्छा भेट होती असे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here