कोरोना काळात विद्यार्थ्यांना विश्वास देण्याचे काम केले : मिलिंद गंधे
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
सन २०१९,२०,२१ मध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट आपल्यावर ओडवले आहे. यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी वेळोवेळी लॉकडाऊन केला. याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये.

यासाठी गेल्या दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आज शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व पालकाचा चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने शासनाच्या सर्व नियम-अटी पाळून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे.
आज माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करून एक विश्वास देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक मिलिंद गंधे यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्या बद्दल विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पद्माकर देशपांडे, सचिव मिलिंद गंधे, उपाध्यक्ष विलास देवी, अविनाश जाधव, राजेंद्र गांधी, संस्थेचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अंजली वल्लाकट्टी देवकर, संजय पाडोळे, सुवर्णा वैद्य, नंदाताई शिंदे, किशोर कासार, नीलिमा शिंदे, योगिनी शिरसागर आदी उपस्थित होते.