माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
वाडियापार्क जलतरण तलावात मृत्यूस जबाबदार म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठेका रद्द करण्याची मागणी
कारवाई न झाल्यास त्रिदल माजी सैनिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथील जलतरण तलावामध्ये कुठलीही सुरक्षारक्षक नसल्याने जीवित हानीची मोठी घटना होऊ शकते अशी तक्रार केली असता देखील तेथे नियमाचे उल्लंघन होत असून ट्रेनिंग सुरक्षा गार्ड नाही. अशा वेळेस लहान मुलांपासून वृद्धापर्यंत पोहण्यासाठी व शिकण्यासाठी येतात त्यांना (सर्टिफाइड लाईफ गार्ड ट्रेनर) तांत्रिक मनुष्यबळ नियमानुसार नेमण्यात यावे असे निवेदन दिले होते परंतु २ जून २०२४ रोजी सकाळी वाडिया पार्क जलतरण तलाव येथे सागर कळसकर नावाचे व्यक्तीचे व्यक्तीचे पोहताना मृत्यू झाला ही बाब कळाली असता जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्या गैरप्रकाराचे व जलतरण तलावामध्ये गांभीर्याने लक्षण न देण्याकारणामुळे झालेला आहे.
अगोदर दिलेल्या अर्जाचा जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतली व जलतरण मध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने व त्यांनी जाणून बुजून कामात कसूर केल्याने निष्काळजी पणामुळे सदरचे प्रकार घटना घडलेली आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जलतरण चा ठेका रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद सह आधी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनाची दखल घेतलीगेली नाही तर त्रिदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.