कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
या पृथ्वीतलावर माणूस घडवण्याचे खरे काम हे शिक्षक करतात त्यामुळे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने गौरवपूर्ण आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी कर्जत येथे बोलताना केले.
आदर्श बहुजन शिक्षक संघ (ईब्टा) यांच्या वतीने आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक, शिक्षिका व गुणवंत अधिकारी हे पुरस्कार दिले.
यावेळी माजी मंत्री राम शिंदे,जिल्हा शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, गट शिक्षण अधिकारी मीनाताई शिवगुंडे,शिवाजीराव फाळके,अशोक खेडकर,नामदेव राऊत,नगरसेविका नीता कचरे,सचिन घुले,सुनील यादव,संघटनेचे राज्य अध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर,महासचिव पी.एस.निकम, जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ,विभागीय अध्यक्ष नवनाथ आडसूळ,संतोष शिंदे,एकनाथ व्यवहारे,शिवाजी पठारे, श्याम राठोड,परमेश्वर रणधरे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिक्षक शिक्षिका नागरिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा सचिव अशोक नेवसे होते.
यावेळी उद्योजक मेघराज बजाज,नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव,मुख्याधिकारी गोविंद जाधव,कचरू पंडित,शरद ढवळे,सुप्रिया निकत, संगीता देशमाने,सुवर्णा मेहेत्रे,सुभाष झेंडे,शबाना सय्यद,सुधाकर काळे,पांडुरंग आढागळे,अपर्णा साबळे, वनिता जगताप,गोरख महानवर,सुवर्णा ससाने,नंदकुमार गोडसे, किसन आटोळे,सत्यवान अनारसे,बाळू गार्डी,या सर्वांना पुरस्कार देऊन संघटनेच्यावतीने सन्मानित करण्यात आले .
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, खऱ्या अर्थाने समाज घडवण्याची सर्वात महत्त्वाच्य आणि मोठे काम हे शिक्षक करत असतात.घ्यावीत हे अतिशय पवित्र कार्य आहे.करोना काळामध्ये देखील ईब्टा या संघटनेने अतिशय चांगले काम केलेले अनेक कुटुंबांना मदत केली समाजातील शिक्षक आणि इतर व्यक्तींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्यानं संघर्ष करण्याचे काम ही संघटना करत आहे.
याबद्दल मला या संघटनेचे विशेष कौतुक वाटते व समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेने समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक असणारे शिक्षक व अधिकारी ज्यांनी चांगल्या कामाचा ठसा उमटवला आहे.त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे.ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांची जबाबदारी याठिकाणी वाढली असून ज्यांना मिळाला नाही त्यांना आणखी चांगले काम समाजासाठी याठिकाणी करावयाची आहे.
असे सांगून राम शिंदे पुढे म्हणाले की कोरूना काळामध्ये शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबरोबर रुग्णालय याचप्रमाणे नाकाबंदी प्रसंगी दारू दुकाने उघडल्यावर त्या ठिकाणी दखील शासनाने काम दिले होते आणि या सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे हे सर्व काम केले यामुळे सर्व शिक्षकांचा आम्हाला अभिमान वाटतो असे राम शिंदे म्हणाले.
यावेळी जिल्हा शिक्षण अधिकारी बी जे पाटील म्हणाले की, ईब्टा या संघटनेने अतिशय प्रेरणादायी असे काम पुरस्कार देऊ याठिकाणी केले आहे याबद्दल मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानतो. कोरी ना काळामध्ये शिक्षकांनी अतिशय चांगले काम केले आणि या संघटनेने चांगले काम करणार्या सर्व शिक्षकांचा व अधिकाऱ्यांचा याठिकाणी गुणगौरव केला आहे. यामुळे या संघटनेचे कौतुक करावे तेवढे कौतुक थोडे आहे .ही संघटना केवळ मागण्या करणारी नसून, दातृत्व आणि प्रेरणा निर्माण करण्याचे देखील काम करते हे पाहून मला अतिशय समाधान वाटले.
यावेळी बोलताना संघटनेचे राज्य अध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर म्हणाले की, ही संघटना अनेक वर्षांपासून समाजामध्ये खऱ्या अर्थाने आदर्श काम करणार्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिक्षक आणि शिक्षकांना पुरस्कार देऊन गुणगौरव करत आहे.
ही संघटना समाजासमोर आणि शासनासमोर सातत्याने एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम करत आहे. या संघटनेने सुरू केलेल्या अनेक उपक्रम राज्याचे शिक्षण विभाग व मंत्री राज्यांमध्ये लागू करत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी बाळासाहेब साळुंखे, अशोक खेडकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक नेवसे यांची भाषणे झाली.प्रस्ताविक संतोष डहाळे सूत्रसंचालन नवनाथ अडसूळ व आभार सुनील कुलांगे यांनी मानले.