मातृतीर्थ सिंदखेड राजा ते पाचाड (रायगड)अभिवादन
यात्रेचे मराठा पतसंस्थेच्यावतीने भव्य स्वागत
माँ जिजाऊंच्या स्मृती सर्वांच्या मनात कायम – उदय अनभुले
नगर – राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिंदखेड राजा (जन्मस्थळ ) ते पाचाड (स्मृतीस्थळ) अशी अभिवादन यात्रेचे नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक सतीश इंगळे, उदय अनभुले, द्वारकाधिश राजेभोसले, बाळासाहेब काळे, ज्ञानदेव पांडूळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, अतुल लहारे, इंजि.श्रीकांत निंबाळकर, डॉ.समीर होळकर, प्रा.अरविंद शिंदे, अमोल सुरसे, केदारनाथ राजेभोसले, अॅड.जय भोसले, अशोक वारकड, अमोल लहारे, शशिकांत भांबरे, मिलिंद जपे, अच्युत गाडे आदि उपस्थित होते. यावेळी या यात्रेचे मुख्य आयोजक व जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी उदय अनभुले म्हणाले, माँ जिजाऊ यांचे कार्य सर्वपरिचित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. रयतची काळजी घेणार्या आणि दुष्मानांनाही घाम फोडणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या स्मृती सर्वांच्या मनात कायम रहावे, यासाठी जयंती व स्मृतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ अशा या अभिवादन यात्रेमुळे त्यांचे कार्य अधिक व्यापक होईल, असे सांगितले.
17 जून राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा स्मृतिदिन याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा नगरमध्ये आली असता, शनिवारी रात्री नगर शहरात जाधव लॉन, कल्याण रोड, अ. नगर या ठिकाणी आगमन झाले. त्या ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी. स्टॅन्ड, नगर येथे महाराजांना अभिवादन करून यात्रा पुढे मार्गस्थ झाली. यावेळी मोठया प्रमाणावर शिवशंभु भक्त व मराठा सेवा संघ, मराठा पतसंस्था, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान पदाधिकारी उपस्थित होते.