माध्यम कक्षाच्या कामकाजाचा निवडणूक निरीक्षक (खर्च) ममता सिंग यांनी घेतला आढावा
एमसीएमसी समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली
शिर्डी ,दि २६ एप्रिल :- शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राहाता येथे माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या कामकाजाचा निवडणूक (खर्च) निरीक्षक ममता सिंग यांनी आज शिर्डी येथे आढावा घेतला. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती ही त्यांनी यावेळी जाणून घेतली.
शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर, शिर्डी माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी सुरेश पाटील, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य महेश देशपांडे आदी उपस्थित होते.
विविध वृत्त वाहिन्या, स्थानिक केबल नेटवर्क व समाजमाध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या जाहिराती, व्हिडीओ यावर करडी नजर ठेवण्याय यावी. उमेदवारांकडून वृत्तपत्र माध्यमे व इलेक्ट्रॉनिक मिडियाद्वारे प्रसारित केलेल्या जाहिराती व पेड न्यूजची काटेकोरपणे तपासणी करण्यात येऊन त्याचा खर्च उमेदवारांच्या प्रचार – प्रसिद्धी खर्चात समाविष्ट करण्यात यावा. अशा सूचनाही श्रीमती ममता सिंग यांनी यावेळी दिल्या.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची कार्यपध्दतीविषयी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
- Advertisement -