माध्यम कक्ष व आचारसंहिता कक्षास निवडणुक निरीक्षकांनी दिली भेट
दोनही कक्षाच्या कामकाजाची केली पहाणी
अहमदनगर,दि १९ एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास व आचारसंहिता कक्षास निवडणूक निरीक्षक (जनरल) रवी कुमार अरोरा व निवडणूक निरीक्षक (पोलीस) पी. अरवींदन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी सुहास मापारी, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य महेश देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी निरीक्षकांनी सर्वप्रथम माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या कामकाजाची पहाणी करत माध्यम कक्षात बसविण्यात आलेल्या दूरचित्रवाणी संचावरून विविध वाहिन्यां, स्थानिक केबल वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या जाहिराती, बातम्या निरीक्षणाच्या कामाची पाहणी केली. कक्षात दररोज येणा-या विविध वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रणाच्या संचाचीही निरिक्षकांनी यावेळी पाहणी केली.
आचारसंहिता कक्षाच्या कामकाजाची पहाणी करत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या एसएसटी,व्हीएसटी, एसएसटी पथकांच्या कामांची माहिती जाणुन घेतली. या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेची माहिती घेत याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी सुहास मापारी यांनी आचारसंहिता कक्षाच्या कामकाजाबाबत तर जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.
- Advertisement -