मानवसेवा प्रकल्पातील निराधार मातेच्या यशस्वी पुनर्वसनाची एक वास्तविक कहाणी…!

0
75

काही वर्षापुर्वी आशयाच्या (नाव बदलून) डोक्यावरील मायेचे छञ हरपले. आई वडीलांच्या मृत्युनंतर आशया पुर्नत: अनाथ झाली. तेंव्हा कुठे जाणार? काय खाणार? कशी जगणार? भविष्य कसे असणार? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या समोर होते. स्वभावाने अगदी साधी भोळी मात्र येणा-या प्रत्येक प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नव्हता. तिला फसवण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी जाळे टाकले, आशया दलालांच्या त्या जाळ्यात अडकत गेली. तिला अनेकदा शोषणाला बळी पडावे लागले. त्यातुन तिला तीन निष्पाप जीव जन्माला आले आणि तिच्याबरोबर त्यांचीही वनवन सुरू झाली या वनवनीत ते मरणही पावले हे सर्व भोवतालच्या समाजापासुन लपलेले नव्हते.लोक तिच्याविषयी नाही नाही ते बोलत होते.कुणाकुणाची तोंडं बंद करणार होती एकटी आशया! नातेवाईकांनी तर तिला केंव्हाच परकं करून सोडलं होत.आई-वडीलांच्या मृत्युनंतर आशयाला आश्रय घेता येईल अशी एकही जागा शिल्लक नव्हती आणि जर कुणी जागा दिलीच तर त्यांचा स्वार्थ जागा होई.असं हे गुंतागुंतीच आयुष्य जगत असतांना आशयाला आयुष्यात एका बदलाची चाहुल लागली. आशयाला जोडीदाराच्या रूपात चांगला पति मिळाला दोघांनी संमतीने लग्न केले काही महिने चांगले सोबत घालवले. पण नंतर आशयाच्या भुतकाळाने पुन्हा तिच्या मनात जागा घेतली आणि आशया मानसिक रूग्ण बनली.

आशया घरात कुणाला काहीही न सांगता मानसिक संतुलन बिघडल्याने घर सोडून गेली. अहमदनगर च्या गल्ली बोळ, रस्ते ,दारोदार, बसस्थानक फिरू लागली. आशयाचे यात अतोनात हाल झाले, आशया आपली विचार शक्ती हरवुन बसली होती. पुन्हा तिचे काही नरधमांनी शोषण केले त्यातुन पुन्हा तिने एका बाळाला जन्म दिला. निष्पाप बाळासह आशयाची माहिती अहमदनगर येथील महिला व बाल विकास विभागाच्या वन स्टॉप सेंटर कडून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली.

वाईट प्रवृतीबरोबर चांगली प्रवृत्तीही जन्म घेत असते याच प्रमाणे, बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात वन स्टॉप सेंटर मार्फत आशयाला दि.०३/१०/२०२० रोजी दाखल करण्यात आले होते. मानवसेवा प्रकल्पात अन्न, वस्र, निवारा या सुविधांसह मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर आणि डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्गदर्शनाने उपचार व समुपदेशन करण्यात आले.

आशया हळू हळू मानसिक आजारातून सावरत होती. हरवलेली स्मरणशक्ती हळूहळू मिळत होती. आठवणा-या सर्व घटना संस्थेचे समुपदेशक सुशांत गायकवाड यांना व स्वयंसेवकांना सागत होती. पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची आशा निर्माण झाली. आशया अतिशय खेळीमेळीने मानवसेवा प्रकल्पात राहत होती. मानसिक आजारातून पुर्ण बरी होताच आता चुलते, मावशी आणि जवळचे नातेवाईक स्वीकारतील अशी पुन्हा आशा निर्माण झाली. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी महिला स्वयंसेवकांसह आशयाला व तिच्या बाळाला बारमती येथील घरी घेवून गेले. मात्र तेथे सगळं अंधारलेलंच होतं. चुलते, मावशी, बहीणी नातेवाईक असूनही स्वीकारायला कोणीही तयार नव्हतं.

मंजिले बड़ी जिद्दी होती हैं
हासिल कहां नसीब से होती हैं
मगर वहां तूफान भी हार जाते हैं
जहां कश्तियां ज़िद पर होती हैं

आशया, पति स्वीकारील की नाही म्हणून माहिती सांगत नव्हती. मात्र प्रकल्पातील महिला कार्यकर्त्या सुरेखा केदार यांनी समुपदेशन करुन तिच्या पतिकडील माहिती मिळवली आणि तिच्या पुढील आयुष्याबाबत संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्याशी चर्चा केली. आशयाच्या पतिची माहिती मिळताच दिलीप गुंजाळ यांनी आशयाच्या पतिकडे संपर्क साधून चर्चा व समुपदेशन केले. पिंपळगाव माळवी येथील युवकाशी तिचा एकमेंकांच्या संमतीने विवाह झाला होता. विवाहाचे फोटो, लग्न पत्रिका आणि विवाहात उपस्थित नागरीकांची भेट घेवून सर्व खात्री केली. कुटुंबातील आधार मिळणे ही आशयाच्या हिताचीच बाब होती मोडलेलं घर पुन्हा बसण्याची ही नवी चाहुल होती. पण यावर चांगला विचार विनिमय होणे गरजेचे होते, पुन्हा आशयाचे पहिल्यासारखे हाल होऊ नये, ती रस्त्यावर येऊ नये, तिच्या घरून अंतर मिळु नये, तिच्यावर कसलाही अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी तिच्या सासरच्या लोकांकडून बाळासह आशयाला सांभाळण्याची खात्री करुन घेतली. लेखी आणि कायदेशिर पुरावे घेवून पतिकडील सर्व नातेवाईकांचे समुपदेशन करुन आशयाला बाळासह दि. २३/०९/२०२१ रोजी कुटुंबाच्या ताब्यात देवून पुनर्वसन केले.

आशयाला साभाळण्यास श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ सर्व सोईसुविधासह खंबीर होती पण आशया एक तारुण्यात होती तिचा संसार व्हावा तिचे हक्काचे मानसं मिळावे. तिचं आयुष्य तिने खंबीरपणे जगावे यासाठी संस्थेने मन मोठे करीत तिला ताकद दिली व जशी माहेरवरून मुलगी सासरला पाठवतात त्याच रितीरिवाजाप्रमाणे तिची पाठवणी केली व माहेर म्हणुन मानवसेवा प्रकल्पाचे दार कायम उघडे आहे असे हक्काने सांगितले त्यावेळचा प्रसंग भारावुन टाकणारा होता.

आशायाच्या पुनर्वसनासाठी सर्व देणगीदार, मार्गदर्शक डॉ. अनय क्षिरसागर, संजय शिंगवी, अ‍ॅड. जयदिप देशपांडे, अविनाश मुंडके, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, शशिकांत चेंगेडे, डॉ. अविनाश मोरे, महेश पवार, शारदाताई हौशिंग, डॉ. सुरेश घोलप, लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, अतिक शेख, योगिता मुथा, भरतभाऊ बागरेचा, स्वप्निल कुलकर्णी, नागराज बडगेरी, प्रदीप पेंढारे, अ‍ॅड. वृशाली तांदळे, धिरज तनपुरे, सागर खेत्रे, शिवदास चव्हाण, रेलफोर फाउंडेशनचे नितीन घोडके, रीचर्डस प्रा. लि.चे रोहीत कर्नावट, कोहीनूरचे अश्वीन गांधी, मनोज गुगळे, अभिजित काळे, सुधीर लांडगे, किरण गवते अ‍ॅड. संतोष गायकवाड, उज्वलाताई बागवाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. संस्थेचे स्वयंसेवक सुरेखा केदार, अविनाश पिंपळे, सुशांत गायकवाड, स्वप्नील मधे, रोहन नायडू, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, शुभांगी माने, पल्लीवी हिवाळे-तुपे, श्रीकांत शिरसाठ, मच्छिंद्र दुधवडे, ऋतिक बर्डे, प्रसाद माळी, अनिल दुधवडे यांनी उपचार समुपदेशन आणि पुनर्वसनाकरीता अतोनात परिश्रम घेतले.
••••••••••••••••••••••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here