‘मानवसेवा’ प्रकल्पातील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी सुसज्ज इमारतीचे उद्घाटन संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

‘मानवसेवा’ प्रकल्पातील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी सुसज्ज इमारतीचे उद्घाटन संपन्न

मानवसेवा प्रकल्पाचे कार्य उल्लेखनीय – रमनलालजी लुंकड

अहिल्यानगर प्रतिनिधी – काशिनाथ बोरगे

पुणे येथील उद्योजक दानवीर श्री रमनलालजी लुंकड यांच्या आर्थिक मदतीने श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पातील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधूंच्या उपचार व पुनर्वसनासाठी सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. मानवसेवा प्रकल्पात उभारल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन रमनलालजी लुंकड व सुवालालजी शिंगवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यांचे नातू आकाश लुंकड यांनी काही महिन्यांपूर्वी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाला भेट दिली होती. आकाश लुंकड यांना मानवसेवा प्रकल्पाचे कार्य भावले आणि कुटुंबीयांशी या कार्याबद्दल चर्चा केली. आजोबा रमनलालजी लुंकड यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाला सुसज्ज इमारतीचे बांधकाम करुन देण्याचे ठरवले. आणि उभारल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन रमनलालजी लुंकड व सुवालालजी शिंगवी याच्या शुभहस्ते दि.७/०४/२०२४ रोजी संपन्न झाला.

ज्यांना समाजाने नाकारलं, ठोकरलं, फसवलं, हेटाळलं, नासवलं त्या निराधार पिडीत मानसिक विकलांगांच्या उसवलेल्या आयुष्यात मायेचा टाका घालायचा…आणि त्यांचे आयुष्य बदलून पून्हा माणुस म्हणून समाजात उभं करायचं हे सर्व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ च्या माध्यमातून दिलीप गुंजाळ हे करत आहेत. हे कार्य प्रत्यक्ष पाहील्यानंतर समजते मानवसेवा प्रकल्पाचे कार्य अतिशय उल्लेखनीय कार्य आहे असे रमनलालजी लुंकड यांनी भूमीपूजन समारंभात म्हटले. रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधूंना पोलीसांच्या मदतीने मायेने आणायचे आणि त्यांना स्वच्छ करुन अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य या मुलभूत सुविधा पुरवायच्या आणि समुपदेशन, उपचार करुन पुन्हा त्यांच्या आयुष्यात नवी दिशा द्यायची पुन्हा माणुस म्हणून समाजात आणि त्यांच्या हक्काच्या कुटुंबात पोहचवून पुनर्वसन करायचे असे कार्य श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा ‘मानवसेवा’ प्रकल्प करीत आहे. अडीच हजार निराधार पिडीत मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधूंचे पुनर्वसन केले आहे आणि सध्या मानवसेवा प्रकल्पात ९३ लाभार्थी उपचार घेत असल्याचे संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले आहे.तर सुत्रसंचालन शिवानी शिंगावी यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, समाजसेवक सुवालाल शिंगवी, सुनिता गरड, आकाशजी लुंकड संजय शिंगवी, नाना भोरे, विकास सांगळे, चंद्रकांत तागड, राजेंद्र छल्लानी, गटागट, लौकिक शिंगवी, भरत बागरेचा, अमर आग्रवाल, सुरेश मैड, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, ऋतिक बर्डे, मथुरा जाधव, प्रशांत जाधव, पुजा मुठे, विकास बर्डे, प्रसाद माळी, सागर विटकर, राहुल साबळे, अजय दळवी, मच्छिंद्र दुधवडे, श्रीकांत शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!