मानसिक विकलांग युवकाला मिळाली माणुसकीची वाट !

0
85

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय या परिसरात एक निराधार मानसिक विकलांग युवक अस्ताव्यस्त आणि मळकटलेले कपडे घालून फिरत होता.

या युवकाची अवस्था पाहून श्रीमती अर्चना झिंजे यांनी माणुस आणि माणुसकी जीवंत ठेवणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पाचे कार्यकर्ते सिराज शेख,अंबादास गुंजाळ यांना कळविले.

या कार्यकर्त्यांनी लागलीच अहमदनगर उपनगरातील तोफखाना पोलीस स्टेशनला कळविले आणि पोलीस काॅस्टेबल मा.श्री एस.एस. क्षीरसागर यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करून मानसिक विकलांग युवकाला बुधवार दि.०८ जून २०२२ रात्री ११:०५ वा. मानवसेवा प्रकल्पात दाखल करुन घेतले.

जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुलें!
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here