मारुती सुझुकीच्या कांकरिया ऑटोमोबाइल्स अरेना शोरुममध्ये स्विफ्ट कारचे अनावरण
नवीन स्विफ्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यातील – आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील आघाडीची ऑटोमोबाईल्स कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने लॉन्च केलेल्या चौथ्या जनरेशनची स्विफ्ट कारचे अनावरण शहराच्या नगर-मनमाड महामार्गावरील मारुती सुझुकीच्या कांकरिया ऑटोमोबाइल्स अरेना शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी एसबीआयचे रिजनल मॅनेजर सूर्यनारायण पांडे, कांकरिया ऑटोमोबाईल्सचे सुरेश कांकरिया, सत्यम कांकरिया, शोरुमच्या संचालिका स्नेहा कांकरिया, साधना कांकरिया आदी उपस्थित होते.
मारुती सुझुकीची स्विफ्ट ही सर्वांच्या पसंतीस उतरलेले वाहन आहे. आकर्षक लुक, सुरक्षा व विविध सुविधांनीयुक्त असलेली नवीन स्विफ्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यातील कार ठरली असल्याची भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली.
चौथ्या जनरेशनच्या स्विफ्ट कारमध्ये अनेक बदल करुन फिचर अपग्रेड आणि ऑल-न्यू झेड सिरीज इंजिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. व्हेरिएंट, इंजिन अन् मायलेज नवीन स्विफ्ट लाइनअपमध्ये एलएक्सआय, व्हीएक्सआय, व्हीएक्सआय/ओ, झेडएक्सआय व झेडएक्सआय प्लस हे पाच प्रकार उपलब्ध आहे. या सर्व प्रकारात नवीन 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असेल. कंपनीच्या दाव्यानुसार, कारचे इंजिन मॅन्युअल ट्रांन्समिशनसह 24.8 प्रति किलोमीटर आणि एएमटी गिअरबॉक्ससह 25.72 प्रति किलोमीटर मायलेज देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्या के 12 पेट्रोल इंजिनच्या तुलनेत नवीन झेड सिरीज इंजिन 3 कि.मी. प्रति जास्त मायलेज देणार आहे. तसेच हे इंजिन 82 बीएचपी पॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
नवीन हेडलॅम्प आणि फॉग-लॅम्प कारला पूर्णपणे फ्रेश लुक देतात. कारच्या इंटिरिअरला स्मार्ट लुक देण्यात आला आहे. यात फ्री-स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टाइल सेंटर ऐसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग देण्यात आले आहे.याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बाजारपेठेत 25 लाख नवीन जनरेशन स्विफ्ट कार विकल्या गेल्या आहेत. नवीन मारूती स्विफ्ट आपल्याला वाहनांच्या विभागातील सर्वोत्तम मालिका (सिरीज) म्हणजे झेड सिरीज मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.चौथ्या जनरेशनच्या स्विफ्ट कार पहाण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी मारुती सुझुकीच्या अरेना शोरुममध्ये उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.