विशाल गणपती मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान- प्रा. माणिकराव विधाते
अहमदनगर प्रतिनिधी – माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त पदी प्रा. माणिकराव विधाते व नितीन पुंड सर यांची निवड झाल्याबद्दल राज पॅलेस हॉटेल च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राजेंद्र ऐकाडे,नंदू ऐकाडे, गणेश पालवे, मच्छिंद्र पडोळे,दत्ताभाऊ गाडळकर, गणेश गाडळकर, सतीश पठारे, वीनीत चंदनापुरकर, नितीन ऐकाडे,ओंकार ऐकाडे,हिरामण चखाले, अल्ताफ शेख, सुमित फुलडहाळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.माणिकराव विधाते म्हणाले की, विशाल गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारे आहे.श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.या संधीच्या माध्यमातून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील वर्षभर विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल
- Advertisement -