माहीजळगाव येथील शेतकरी कुटुंबातील एका युवकाचे अपहरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील शेतकरी कुटुंबातील एका युवकाचे बळजबरीने अपहरण करण्यात आले असून,त्यांचा ट्रॅक्टर देखील नेण्यात आलेला आहे.या घटनेची चौकशी करावी व संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली.तसे निवेदन पोलीस निरीक्षक कर्जत यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष दीपक काटे,दत्ताभाऊ जगताप,कृष्णा शिरसागर, विक्रमपंत थोरात,मंगलदास निकाळजे,सचिन खुडे,सचिन नेटके,किशोर सुद्रिक,सचिन साळुंखे,भैय्या डानी,लहू शिरसागर,सागर दळवी, सिकंदर शेख,संदीप केसकर,सोनू भिसे,ऋषिकेश शिरसागर,सचिन शिंदे,मंथन पवार,नाना गोडसे व अक्षय पोकळे यांच्या सह्या आहेत.

या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की तालुक्यातील माहिजळगाव येथील शेतकरी बापू होटकर व जेडगे या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीवर बापू मुरलीधर आजबे व सचिन सुभाष शेटे यांनी धाक दडपशाही करून त्यांचा तरुण मुलगा याचे अपहरण करून बळजबरीने ट्रॅक्‍टर घेऊन गेले आहेत.

हा मुलगा बेपत्ता असून त्याचे नेमके काय झाले आहे ते समजण्यास मार्ग नाही,तरी पोलिस विभागाने तातडीने याबाबत शोध लावून संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी व गरीब शेतकरी कुटुंबातील नागरिकांना न्याय द्यावा.

अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर संघटनेच्यावतने आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!