माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर – दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई देण्याची परंपरा आहे. ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो. हमखास प्रेमाचे प्रतिक असणारे वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशांसाठी दीपोत्सव दु:ख आणि निराशेचे शोकपर्व असते.

अशा वंचित माता-भगिनींना सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजींच्या प्रेरणा आणि प्रयत्नातून आज माहेरची साडी भाऊबीज म्हणून मिळाली. नगर जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या सा-या माता-भगिनी ही भाऊबीज मिळाल्यावर अक्षरशः गहिवरल्या.

ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नाही किंवा ओळखही नाही असे भाऊ नवे नाते जोडण्यासाठी पुढे आल्याने कोणालाच अश्रू आवरले नाहीत. अनौपचारिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित भगिनीतर्फे शोभा साळुंखे, पल्लवी गायकवाड, जया जोगदंड, मीना पाठक आदींनी यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात महिलांच्या भावना व्यक्त केल्या. आपल्याला मिळालेली माहेर ची साडी म्हणजे केवळ वस्त्र नसून जगण्याची उमेद आणि नवी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मागील १७ वर्षापासून औटी गुरुजी यांच्या प्रेरणेने माहेरच्या साडीचे अभियान दिवाळीत राबवितात. मागील वर्षी स्व. धर्मराज शंकर औटी गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा कार्याचा वारसा त्याचे पुत्र मळूराज औटी आणि त्यांच्या कन्या मंगल म्हस्के, इंदिरा भालसिंग, आशालता बेरड, सुनिता नरसाळे, अनिता अकोलकर आणि अभंग प्रतिष्ठान, देहू पुणे यांनी पुढे चालविण्याचा निश्चय केलेला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी प्राधिकरण सेवाचे सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील तर विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दर्शना बारावकर, मानवी तस्करी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. नांदूरकर, ए.आर.टी. विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे कायदे सल्लागार अँड. अर्जुन नेहरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीचे सदस्य अँड. भूषण बर्हाटे, अँड. विक्रम वाडकर, अभंग इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य डॉ. कविता अय्यर, अभंग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास कंद, स्नेहालय पालक किरीटी मोरे, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्नेहालय संस्थेतील तसेच ईतर कुटुंबाने नाकारलेल्या महिलांसाठी मळूराज औटी, मंगल म्हस्के, इंदिरा भालसिंग, आशालता बेरड, सुनिता नरसाळे, अनिता अकोलकर, विकास कंद, अभंग इंग्लिश मेडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देहू, पुणे, शिरीष कुमार मित्र मंडळ, सौ. निर्मला जगदीश बलसेकर ठाणे, मा. प्रकाश कराळे, बिबिशन खोसे, डॉ. अहेफाज मुलाणी, विद्या मगर, भानाभाऊ मोरे आणि इतर अनेक देणगीदार यांनी बाजारातील सुमारे ५०० रुपये सरासरी किमतीच्या साड्या विकत घेवून त्या भाऊबीजेच्या निमित्ताने अशा भगिनींना दिल्या जातात.

माहेरची साडी या उपक्रमात मा. किरीटी मोरे, श्री. प्रमोद ओरपे, श्री. कुमार वेंकटराम, श्रीकांत मोरे, सुजित मोरे, विकास कंद, सचिन कुंभार, सागर मोरे, नारायण पचपिंड, निलेश मिरजकर, सुरेश गाडे, अमित गायकवाड, सचिन काळोखे, अजिंक्य साकोरे, राकेश बुचुडे, अतुल झेंडे, प्रशांत (बाबू) काळोखे, सचिन लिंभोरे मा. बलसेकर सर, सरस्वती साडी डेपो आदी या ”भगिनींचे भाऊ” उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने महिलांना मिठाईचे बॉक्स देण्यात आले. यासाठी पोलीस उपनिरीक्षक बी. बी. नांदूरकर आणि एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक स्नेहालय संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. गिरीश कुलकर्णी, सूत्रसंचालन स्वाती रानडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय गुगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण मुत्याल, दीपक बुरम, आकाश काळे, प्रविण बुरम, अशोक चिंधे, सचिन पवार संजय जिंदम, मझहर खान, योगेश अब्दुल्ले, अंबादास शिंदे, मीना पाठक, सविता करांडे, आशा जाधव, आदींनी प्रयत्न केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!