माहेश्‍वरी युवा संगठनच्यावतीने महेश नवमी निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा ठरली सर्वांचे आकर्षण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माहेश्‍वरी युवा संगठनच्यावतीने महेश नवमी निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा ठरली सर्वांचे आकर्षण

नगर – माहेश्‍वरी युवा संगठनच्यावतीने महेश नवमीनिमित्त नगर शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेस महेश मंगल कार्यालय येथून प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा रामचंद्र खुंट, तपकिर गल्ली, सराफ बाजार, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, आडते बाजार मार्गे पुन्हा महेश मंगल कार्यालय येथे आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकरची आरती करण्यात आली. पारंपारिक वेशभुषतील स्त्री-पुरुष, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, घोडागाडी, बॅण्ड पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

माहेश्‍वरी समाजाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे ‘महेश नवमी’ होय. या उत्सवानिमित्त समाजातील सर्व घटकांना एकत्रित करुन समाजोन्नत्तीचे उपक्रम राबविले जात आहे. सण-उत्सवातून आपली संस्कृती जपण्याचा  प्रयत्न केला जात आहे. समाज संगठन करुन समाजातील प्रत्येक घटकांच्या अडचणी, प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. आज महेश नवमीनिमित्त शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली, यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या कला-गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभर विविध उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येते. महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, चित्रकला, हस्ताक्षर, बुद्धीबळ, गायन-वादन, पौराणिक प्रश्‍नमंजुषा आदि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहेश्‍वरी युवा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व माहेश्‍वरी समाज बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेत सर्व कार्यक्रम यशस्वी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!