माहेश्वरी युवा संघटना आयोजित गायन व वादन स्पर्धा संपन्न
संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती साधली जात आहे – श्रीगापोल धूत
नगर – आज विविध टीव्ही चॅनेलवर गायन आणि वादन स्पर्धांमधून कलाकारांना मोठी संधी मिळत आहे. छोट-छोट्या शहरातील अनेक कलाकार आपली कला सादर करुन प्रसिद्धीस येत आहेत. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक स्तरावर अशा मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. आज माहेश्वरी युवा संघटनेने या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे त्यांची कला सर्वांसमोर येत आहे. यातूनच भविष्यात एखादा कलाकार देशपातळीवर नाव चमकवेल, असा विश्वास आहे. माहेश्वरी युवा संघटना विविध उपक्रमातून समाजात मोठी जागृती करत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांची उन्नत्ती साधली जात आहे. अशा उपक्रमांमुळे समाज संघटन होण्यास मोठी मदत होत आहे, असे प्रतिपादन श्रीगोपाल धूत यांनी केले.
श्री महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवा संघटनेने गायन व वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी युवा संघटन अध्यक्ष शाम भुताडा, पियुष झंवर, विशाल झंवर, मधुर बिहाणी, गोविंद जाखोटिया, प्रतिक सारडा, पवन बिहाणी, पवन बंग, सुमित बिहाणी, सुमित चांडक, सिद्धार्थ झंवर, शेखर आसावा, अभिनंदन कलाणी, गोविंद दरक, संग्राम सारडा, भुषण काबरा, प्रणव बिहाणी, मुकुंद जाखोटिया आदिंसह समाजातील मान्यवर मधुसूदन सारडा, बजरंग दरक, हनुमान बिहाणी, अरुण झंवर, श्रीगोपाल जाखोटिया, अविनाश बिहाणी आदि उपस्थित होते.
प्रास्तविक अध्यक्ष शाम भुताडा, म्हणाले, समाजाचे संघटन हा दृष्टीकोन ठेवून संघटनेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमातून समाजातील युवक, विद्यार्थी, महिला यांची प्रगती साधली जात आहे. गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, युवकांना रोजगार, नोकरीसाठी सहकार्य अशा उपक्रमांमुळे समाज जागृत होत आहे. सामाजिक दायित्व जपत सामाजिक संस्थांनाही मदतीचा हात दिला जात आहे. आजच्या गायन व वादन स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.
या स्पर्धेचे प्रकल्पप्रमुख पियुष झंवर, विशाल झंवर यांनी नियोजन केले. तर परिक्षक म्हणून कल्पेश उदावंत, सौ.पुनम इंगळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुर बिहाणी यांनी केले. सर्व कार्यक्रम रामकृष्ण एज्यकेशन फाऊंडेशन च्या सभागृहात संपन्न झाले