- Advertisement -
ना.शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी – सध्या समाज माध्यमांवर ना.शंकरराव गडाख याच्याबाबत काही व्हिडीओ क्लिप काही ओडिओ क्लिप प्रसारित झालेल्या असून त्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा तसेच महाराष्ट्र हादरून गेलेला आहे.या ऑडिओ क्लिप मध्ये संबंधीत आरोपीने इस्त्रायली बनावटीचे २१ पिस्टल अवैधरीत्या मिळवलेली असून मा. मंत्री व त्यांचे पुत्र यांना जीवनिशी मारून टाकण्याची भाषा केलेली आहे.
सरकारमधील एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याना अशा प्रकारे धमकी देऊन संपवण्याची भाषा करणे हे लोकशाहीला घातक आहे.या ऑडिओ क्लिप मुळे राजकीय नेते, पदाधिकारी, पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यात घबराट व दहशत निर्माण झालेली आहे.
ना.शंकरराव गडाख व त्यांच्या पुत्राची जिवानीशी हत्या करण्याचे कट कारस्थान रचल्याचा उदेश संपूर्ण ऑडिओ क्लिप मधून स्पष्ट होत आहे.तरी, वरील सर्व बाबींचा विचार करता सदर आरोपीविरुध्द शस्त्र अधिनियम व कायद्यातील इतर तरतुदी प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करावा.तसेच सदर आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगर शहरातील शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना निवेदनाद्वारे केली.
यावेळी दिलीप लुंकड, अजय ढोणे,विजय बोरुडे,चंद्रकांत बोरुडे,उमेश साळी,व्यंकटेश ब्रह्मदंडी, संदीप तवले,प्रताप भैया परदेशी, विशाल कांबळे,अभिजीत ढोणे, सागर कंदूर,शैलेश भागवत,चेतन गोधडे, सचिन कुक्कडवाल,बापू गीते, प्रवीण ढोणे आदी उपस्थित होते.
- Advertisement -