मिशन आरंभ अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत अरणगाव शाळेचा विक्रम
जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले जिल्हा परिषद केंद्र शाळा अरणगावचे वीस विद्यार्थी
अहमदनगर प्रतिनिधी – काशिनाथ बोरगे
जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. आशिष येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी साठी मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षादिनांक 10 मार्च 2024 रोजी घेण्यात आली . यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चौदा ही तालुक्यातील इयत्ता चौथी व इयत्ता सातवी या दोन वर्गाचे सुमारे बेचाळीस हजार विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते .
या परीक्षेत अरणगाव शाळेचे तब्बल वीस विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.
यामध्ये स्वप्निल अंकुश गव्हाणे (23), रुद्राक्ष गणेश शेलार , (37 )सोहम गोरक्षनाथ कार्ले (40 ) ,समीक्षा दशरथ कांबळे(52), ईश्वरी सोपान कोतकर (57), सोहम संतोष फसले (59), खुशी नवनाथ फसले (63), रितिकेश नितीन अरुण (63),मयूर नवनाथ पवार (66), सोहम काशिनाथ बोरगे (67), आदेश चंद्रकांत पुंड (69), साहिल ज्ञानेश्वर फुलारे (70), अभिनंदन विठ्ठल गहिले (70), स्वप्निल सुनील गहिले (71), आरोही शुक्लेश्वर कांबळे (71) साक्षी देविदास फसले (72), चैतन्य सुभाष पुंड (72), विराज योगेश पवार (81), वैष्णवी श्रीकांत शिंदे (81), सोनू सतीश जाधव (81) या विद्यार्थ्यांचा समावेश जिल्हा गुणवत्ता यादीत झाला आहे .
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरणगाव शाळेच्या यशामुळे अरणगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक यांच्याकडून शाळेचे कौतुक होत आहे . मराठी माध्यम शाळेकडे यामुळे ओढा निर्माण झाला आहे .ही बाब खरोखरीच अभिमानास्पद आहे .
मिशन आरंभ अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री.उदय कुमार सोनावळे साहेब,विस्तार विस्तार अधिकारी माननीय श्रीम. प्रतिभा साठे मॅडम ,गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बाबुराव जाधव साहेब यांचे मार्गदर्शन लाभले .
सतत शाळेसाठी झटणाऱ्या मुख्याध्यापिका श्रीम.रेखा लहाकर मॅडम ,वर्गशिक्षक श्रीम. ज्योती कदम मॅडम, श्रीम. कमल गवळी मॅडम यांचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे .सर्व पात्र विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन .