मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत दरेवाडीच्या प्रताप भोगाडे यांची उत्कृष्ट कामगिरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

दरेवाडी ग्रामस्थ व प्रताप हेल्थ क्ल्बच्यावतीने भव्य सत्कार

 

अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे

आयबीबीएफ आयोजित मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत नगर तालुक्यातील दरेवाडीचे सुपुत्र प्रताप भोगाडे यांनी पाचवा क्रमांक पटकावला विजय मिळवला आहे. बालेवाडी स्टेडियम (पुणे) येथे झालेल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत भोगाडे यांनी अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाचवा क्रमांक मिळवला. त्याचा दरेवाडी ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, दरेवाडीचे सरपंच सुभाष बेरड, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेरड, बद्रिकाका बेरड, नरेश बेरड, बळीराम बेरड, सुनील बेरड, मच्छिंद्र बेरड, सचिन बेरड, विशाल ससे, दीपक बेरड, प्रा.अशोक बेरड, विक्रम भोगाडे, प्रशिक्षक सोहेल शेख आदी उपस्थित होते.

यावेळी सद्दाम शेख जुनियर भारत श्री झाल्याबद्दल तसेच त्यांचे प्रशिक्षक सोहेल शेख यांचाही सत्कार करण्यात आला.

हरिभाऊ कर्डिले म्हणाले की, प्रताप हेल्थ क्लबच्या प्रताप भोगाडे यांनी केलेली कामगिरी गावासाठी तसेच संपूर्ण नगर तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याने पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी केली होती. गावातील हरिनाम सप्ताह साजरा होत असताना भोगाडेे यांनी मिळवलेले यश अधिक आनंद देणारे आहे. भविष्यातही ते आणखी उत्तुंग भरारी घेतील असा विश्वास आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!