मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडला जाईल – आ. संग्राम जगताप

- Advertisement -

मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत वरद लोखंडे जिल्ह्यात प्रथम ; आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न 

मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडला जाईल – आ. संग्राम जगताप

नगर : शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी वरद लोखंडे याने इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत भाग घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, प्रा. माणिकराव विधाते, दिनेश जोशी, युवराज शिंदे, सुमित कुलकर्णी, संतोष लोखंडे, कुणाल लोखंडे, शिवम लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, सचिन शिवले, निखील हाजारे, राहुल तोडमल, ऋषिकेश काळे, श्रीराज गायकवाड आदी उपस्थित होते.

  आ. संग्राम जगताप म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाची देखील खरी गरज आहे, यासाठी इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडला जाईल, आजची युवा पिढी भरकटत चालली आहे, त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी मूल्यशिक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे.
  समाजात वावरत असताना आपल्या मूल्यांचा आणि नैतिक-अनैतिकतेचा विचार होणे , चांगल्या वाईट गोष्टी समजणे अत्यंत गरजेचे आहे, शिक्षणाद्वारे जीवनाला आकार येत असतो. पारंपरिक शिक्षण पद्धतीद्वारे मूल्यांचाही धडा मिळाला तर ते चांगलेच आहे असे सांगत वरद लोखंडे याने मिळालेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles