मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत वरद लोखंडे जिल्ह्यात प्रथम ; आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न
मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी घडला जाईल – आ. संग्राम जगताप
नगर : शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी वरद लोखंडे याने इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धेत भाग घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, प्रा. माणिकराव विधाते, दिनेश जोशी, युवराज शिंदे, सुमित कुलकर्णी, संतोष लोखंडे, कुणाल लोखंडे, शिवम लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, सचिन शिवले, निखील हाजारे, राहुल तोडमल, ऋषिकेश काळे, श्रीराज गायकवाड आदी उपस्थित होते.