नगर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; लहान मुले पिंजऱ्यात कुत्रे मोकाट
मनपा स्थायी समितीत नगरसेविका रूपालीताई वारे यांनी मोकाट कुत्र्याची दहशत ही प्रतिकृती प्रशासनाला भेट
नगर : शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांच्या झुंडीमुळे लहान मुले घराबाहेर पडत नसून पालक देखील लहान मुलांना कुत्र्याच्या भीतीपोटी खेळण्यासाठी बाहेर जाऊन देत नाही, त्यामुळे लहान मुलांचे बालपण हिरवले जात आहे. महापालिका मोकाट कुत्रे पकडण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे मात्र कुत्र्यांची संख्या कमी झाली नसून ती अधिक वाढली आहे मोकाट कुत्रे एकत्रित येऊन नागरिकांवरती हल्ले करत आहे, यापूर्वी शहरात कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. रात्री अपरात्री नागरिक प्रवास करून घरी जात असताना कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे शहरात दहशत पसरली आहे ते अचानकपणे नागरिकांवर व लहान मुलांवर हल्ला करत आहे त्यामुळे महापालिकेच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहे तसेच शहरातील नागरिकांना सुरक्षा देता येत नसेल तर नगरसेविका म्हणून काम करण्याची लाज वाटते, तरी मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका रूपाली वारे यांनी केली.
मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेविका रूपाली वारे यांनी मोकाट कुत्र्याची दहशत ही प्रतिकृती मनपा प्रशासनाला भेट दिली आहे. यावेळी सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक सुनिल त्रिंबके, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
चौकट : अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचा रोष आमच्यावर येत आहे, जर अधिकाऱ्यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मार्गी न लावल्यास त्यांच्या घरी मोकाट कुत्रे सोडले जातील. यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
उपायुक्त सचिन बांगर म्हणाले की मोकाट कुत्रे पकडणे व शस्त्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रियेला वेळ लागणार होती यासाठी तातडीने कोटेशन मागवले आहेत