मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत ठाणे येथील विक्रमादित्य कुलकर्णी विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी खेळाडू गुजरात, आंध्र प्रदेश, ड्यू दमन, गोवा, तमिळनाडू इत्यादी राज्यातून 360 खेळाडू सहभागी झाले असून 172 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू देखील या स्पर्धेत होते. इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. साडेपाच वर्षाचा बाळ खेळाडू तसेच 83 वर्षाचे वयस्कर खेळाडूंनी देखील या स्पर्धेत आपले बुद्धीचे कौशल्य दाखवण्यासाठी आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी अहमदनगर जिल्हा उद्योग संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे सर, शाम कांबळे, पंच प्रविण ठाकरे, सहाय्यक पंच शार्दूल तपासे, यशवंत पवार तसेच पालक प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, शाम कांबळे, प्रकाश गुजराथी, संजय खडके, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, अनुराधा बापट, डॉ स्मिता वाघ, रोहिणी आडकर, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी, देवेंद्र वैद्य इ चे सहकार्य लाभले. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे. प्रमुख विजेता गट प्रथम- विक्रमआदित्य कुलकर्णी, द्वितीय- प्रथमेश सहरला, तृतीय- हर्ष घाडगे, चतुर्थ -प्रज्वल आव्हाड, पाचवे- अक्षज पाटील, सहावे- ऋषिकेश काबनोरकर, सातवे- अर्णव खेडकर, आठवे- विश्वजीत जाधव, नववे- ओमकार कडव, दहावे- शरणार्थी श्लोक, अकरावे- हृषिकेश चव्हाण, बारावे-खुशी अग्रवाल, तेरावे- राजसुंबा निरव, चौदावे- आराध्या टीकम, पंधरावे- नंकानी नील… अठराशे मानांकना खालील विजेते..
प्रथम- अथर्व सोनी, द्वितीय-यश कापडी, तृतीय-सुदीप पाटील, चतुर्थ-सौमिल गोगते, पाचवे- लालितादिताय्यानार बूमिणाठण, सहावे-लयेर चिन्मय, सातवे-अभय भोसले, आठवे-वीर शहा, नववे-कार्तिक कुंभार, दहावे-दर्श शेटे, अकरावे-रुपेश भोंगळ , बारावे-सतीश अनिरुद्ध , तेरावे-अभिजीत विक्रमाआदित्य, चौदावे-वैभव बोरसे, पंधरावे-ओम गाडे.. बिगर मानांकित विजेते प्रथम- महेक कटारिया, द्वितीय-भार्गव कविटकर, तृतीय- रोनक जकोटिया, चतुर्थ- झड रेयंश, पाचवे- आदित्य पवार, सहावे- क्षितिज पगर, सातवे-समृद्धी पाटील, आठवे- प्रिजेश वेल्ल्याठुपरंबिल..
बेस्ट वेटरण ६० प्रथम- ओ.पी तिवारी, द्वितीय-सुरेंद्र सरदार, तृतीय- मिलिंद पारले, चतुर्थ- दीपक ढेपे, पाचवे- ईश्वर रामटेके, सहावे- गिरीश थोरवेकर, सातवे- चंद्रकांत चौधरी, आठवे- सोमवंशी नातू.. उत्कृष्ट महिला. प्रथम- अवनी आचारे, द्वितीय- प्रतीती खंडेलवाल, तृतीय- तनवी बोरते, चौथे- श्रद्धा पडवेकर, पाचवे-स्वराली कोठे, सहावे- शर्वरी बाकलीवाल, सातवे- वेदिका पल, आठवे- सिद्धी बोमणे.. उत्कृष्ट अहमदनगर खेळाडू. प्रथम- आशिष चौधरी, द्वितीय- दीपक सुपेकर, तृतीय- सुनील जोशी, चौथे-श्रीराज इंगळे, पाचवे- परम गांधी, सहावे- आरुष आया, सातवे- शिवप्रसाद काळे, आठवे-अथर्व पाटील..
उत्कृष्ट १३ वर्षाखालील. प्रथम-आदित्य चव्हाण, द्वितीय- आरव लांडे, तृतीय- कुशाग्ररा पलवाल, चौथे-परम जलन, पाचवे-अलौकिक सिन्हा, सहावे-मधुकर कऱ्हाडे, सातवे-अर्णव धायगुडे, आठवे- शौर्य बगडियां.. उत्कृष्ट ९ वर्षाखालील. प्रथम- दर्श पोरवाल, दुतीय- गोरक्ष खंडेलवाल, तृतीय- नीव बाफना, चौथे- विश्वजा देशमुख, पाचवे- शौर्य भोंडवे, सहावे- श्रावणया बालगुडे, सातवे- अभयद्य दायमा, आठवे- देवांश भामरे.. उत्कृष्ट ७ वर्षाखालील. प्रथम- काविष भट्टाड, द्वितीय-शर्विल भागुरकर, तृतीय-शाश्वत देशमुख, चौथे-कैवल्या भरसकले, पाचवे- सुघोश कंकल. आधी खेळाडू विजयी झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुणात ढोकले सर यांनी केले तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मांडले……