मोतीलालजी फिरोदिया आखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धीबळ स्पर्धेत ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन व अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या वतीने आयोजित बडी साजन मंगल कार्यालय येथे सुरु असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेचे जि. प. लेखा व वित्त अधिकारी रमेश कासार यांनी भेट देऊन ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे व आयोजकांचे कौतुक करत म्हणाले की, बुध्दीबळ खेळामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. स्मरणशक्ती वाढते. निर्णय क्षमता प्राप्त होते. तसेच स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत ३६० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला असून हे स्पर्धा ३ मे ते ७ में या कालावधीत संपन्न होत आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या २० ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
या अनोख्या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे कौतुक केले. स्पर्धेतील सहभागी ज्येष्ठ खेळाडूं ईश्वर रामटेके नागपूर, बलभीम कांबळे नगर, गजानन चिपळूणकर पुणे, सुरेंद्र सरदार ठाणे, विजय कुलकर्णी नगर, निवृत्ती इंगळे बुलढाणा, शरद भाई शुक्ला गुजरात, लाल गोविंद कोल्पेक नगर, अशोक राधेवार अकोला, मिलिंद पार्ले हरियाणा, गिरीश मुळे ठाणे, नथू सोमवंशी जळगाव, दीपक ढेपे बीड, ओ.पी.तिवारी मध्य प्रदेश, प्रदीप कुलकर्णी पुणे, सुरेंद्र चांदोले पुणे, चंद्रकांत चौधरी पुणे, सुनील जोशी नगर यांचा सत्कार जि.प. लेखा व वित्त अधिकारी रमेश कासार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट सर, पारुनाथ ढोकळे सर, पंच प्रविण ठाकरे, प्रकाश गुजराथी, यशवंत पवार, शार्दूल टापसे, खजिनदार सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, प्रकाश गुजराथी, संजय खडके, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, ओंकार बापट, देवेंद्र वैद्य, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी, सौ. अनुराधा बापट, सौ. स्मिता वाघ, सौ.रोहिणी आडकर आदीसह खेळाडू पालक, प्रशिक्षक उपस्थित होते.