म्हसोबा झाप गावाने करून दाखविला… एकाच दिवसात ३०० लसीकरणाचा टप्पा पार !

0
85

सरपंच प्रकाश गाजरे यांचा पुढाकार.

गावकऱ्यांनी मानले आरोग्य यंत्रणेचे आभार.

पारनेर प्रतिनिधी – निलेश जाधव

तालुक्यातील म्हसोबाझाप येथे ग्रामीण भागातील आदिवासी समाजासाठी उपक्रमशील सरपंच प्रकाश गाजरे यांनी एकाच दिवसात ३०० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करून आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून गावातील शेवटच्या घटकापर्यंत लस देण्याचे काम अतिशय शांततेत पार पडले.

या कामी गावचे सरपंच प्रकाश गाजरे, पांडुरंगशेठ आहेर, कैलास आहेर, संजय आहेर, गोरख आहेर, लहु हांडे, पंकज बेलकर, गणेश वाकळे, अशोक आहेर, विठ्ठल सहाणे, संपत दरेकर, गोविंद दरेकर, अजित आहेर, उध्दव आहेर, विठ्ठल दरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यांनी सर्वांनी मिळून चांगले नियोजन केले होते.

म्हसोबा झाप येथील नागरीकांसाठी सरपंच प्रकाश गाजरे यांनी खडकवाडी आरोग्य केंद्रातून ३०० लस उपलब्ध करून घेतल्या व आरोग्य कर्मचारी डॉ. गायकवाड डॉ. सलमा तांबोळी, आशा स्वयंसेविका अर्चना खैरे, यांच्या माध्यमातून त्या ग्रामस्थांना देण्यात आल्या.

यावेळी बोलताना सरपंच प्रकाश गाजरे म्हणाले की कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता सर्व ग्रामस्थांनी लस घेणे गरजेचे आहे. म्हसोबा झाप येथील ग्रामस्थांना एकाच दिवशी ३०० पेक्षा जास्त लस या ठिकाणी उपलब्ध करून त्या देण्यात आल्या आहेत. यासाठी आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे जे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी म्हसोबा झाप ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here