अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
म. ज्योतिबा फुले यांचे कार्य व लेखनातून जातिसुधारणेनंतरच्या चळवळींना प्रेरणा मिळाली – किशोर कानडे
नगर : शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर विचारवंत समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि लेखन यांनी भारतातील जातिसुधारणेच्या नंतरच्या चळवळींना प्रेरणा दिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारक म्हणून मोलाची भूमिका बजावली आणि त्यांनी नेहमीच समाजाला योग्य मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी समर्पित केले त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणादायी ठरत आहे असे प्रतिपादन चेअरमन किशोर कानडे यांनी केले.
अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी चेअरमन किशोर कानडे, व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, मनपा कामगार युनियनचे सचिव आनंद वायकर, उपाध्यक्ष नंदकुमार नेमाणे, पंडित वाघमारे, राजेश सातपुते, संचालिका प्रमिला पवार, उषा वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की, महापुरुषांनी समाजात रुजवलेल्या कार्य आणि विचारांमुळेच आम्हाला देखील सर्व क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.