राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन
म. ज्योतिबा फुले यांच्यामुळे महिला साक्षर झाल्या व कुटुंब व्यवस्था सुधारण्यास मदत झाली – आ. संग्राम जगताप
नगर : महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा काढून क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये उज्वल असे काम करत आहे, महिला साक्षर झाल्यामुळे कुटुंब व्यवस्था सुधारण्यास मदत झाली आहे, महिलांचा देखील देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे, समाज सुधारण्याची लोकचळवळ महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभी केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन करताना आ. संग्राम जगताप, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, राष्ट्रवादी महिला ओबीसी सेलच्या अध्यक्षा रेणुका पुंड आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे म्हणाल्या की, महिलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या फुले दाम्पत्यांमुळे महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेल्याने आज देशाच्या सर्वोच्च पदावर महिला विराजमान झाल्या आहे, महात्मा फुले यांच्यामुळेच महिलांना समाजात एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे असे त्या म्हणाल्या