म. ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारी विचारातून  प्रगल्भ राष्ट्र निर्माण झाले-आयुक्त डॉ. पंकज जावळे

मनपाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

म. ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारी विचारातून  प्रगल्भ राष्ट्र निर्माण झाले-आयुक्त डॉ. पंकज जावळे

नगर : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराच्या माध्यमातून देशाची प्रगती झाली असून सामाजिक एकोपा, प्रेम निर्माण होऊन प्रगल्भ राष्ट्र निर्माण झाले आहे. महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे खुली करून दिली असल्यामुळे आपल्या देशाने विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली आहे असे प्रतिपादन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.
       मनपाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आयुक्त डॉ. पंकज जावळे समवेत आ. संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा.  माणिकराव विधाते, सुरेश खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, आनंद पुंड, बंडू इवळे आदी उपस्थित होते.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles