यतीमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतीमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या (मराठी माध्यम) इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. दोन विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहे. तर 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि13 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 93.33 टक्के लागला आहे. विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम- शेख आयेशा आसिफ (81.20 टक्के), द्वितीय- शेख सादिया सलीम (81 टक्के), तृतीय- सिमरन पापाभाई (73 टक्के) हे विद्यार्थी चमकले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षिका मेघा कुलकर्णी, समीना इनामदार, नाझिया शेख यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त, सर्व पदाधिकारी व विद्यालयाच्या प्राचार्या सौ. शाहिदा सय्यद यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.