यवतमाळ येथील घटनेचा नगरमधील ओबीसी समाजाच्यावतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करुन निषेध
अपप्रवृत्तीकडून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न – अनिल निकम
नगर-
आज समाजात नितीमुल्य राहिलेली नाहीत, ज्या राष्ट्र पुरुषांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी आपले आयुष्य वेचले, अनेक आघात सहन करुन एक सक्षम समाज निर्मिती केली. परंतु आजही समाजात अपप्रवृत्ती बाकी आहे, या अपप्रवृत्तीकडून समाजा-समाजात तेढ निर्माण होतील असे कृत्य केले जात आहे. यवतमाळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना निषेधार्थ आहे. या घटनेमागे असलेल्यांना तातडीने शोधून अटक करुन कडक शासन करावे. जेणे करुन यापुढे अशी कृती पुन्हा होणार नाही. शासनाने यावर तातडीने पाऊले उचलावीत, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी नेते अनिल निकम यांनी दिला.
यवतमाळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचा नगर शहर ओबीसी समाजाच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करुन निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नेते अनिल निकम, अनुरिता झगडे, सुरेश आंबेकर, नितीन भुतारे, राजेंद्र पडोळे, भाऊसाहेब कोल्हे, जवाहरलाल पोखरणा, अनिल इवळे, प्रकाश इवळे, नारायण इवळे, बाबासाहेब साठे, गणेश कोल्हे, लवेश गोंधळे, मच्छिंद्र बनकर, बजरंग भुतारे, बाळू चत्तर, सुधाकर कानडे, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते.
यावेळी अनुरिता झगडे म्हणाल्या, महात्मा फुले हे सर्वच समाजाचे आदरस्थान आहे, स्त्री शिक्षण,समाज सुधारणा बाबत त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांच्या कार्याचे प्रेरणा ही आपल्याला पुतळे, प्रतिमेतून मिळत असते. परंतु समाजातील विघातवृत्ती या पुतळ्यांना टार्गेट करुन समाजात दुजाभाव निर्माण करत आहेत, हे कृत्य निषेधार्थ असेच आहे. परंतु महात्मा फुले यांचे जनसामान्याच्या मनातील विचार पुसू शकत नाही. नगरमधील ओबीसी समाजाच्यावतीने माळीवाडा येथील पुतळ्यास जलाभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात येऊन यवतमाळ घटनेचा निषेध केला असल्याचे सांगितले.