युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीपदी विष्णू गुळवे यांची निवड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

गेल्या महिन्यांपासून पक्ष संघटनापातळीवर केलेल्या कामाची दखल घेवून युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी विष्णू महादेव गुळवे यांची नुकतीच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी नियुक्ती केली आहे. नगर दौर्‍यावर आलेले राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुळवे यांचे अभिनंदन करून त्यांना नियुक्तीपत्र दिले.गुळवे पक्ष संघटनापातळीवर करीत असलेल्या कामाचे कौतूक वाबळे यांनी केले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसामन्यांना न्याय देणार आहे. अनेकांना या पक्षाने मोठे केले. पण आज त्यांनी पक्षाकडे पाठ फिरविली असली, तरी नव्याने तरूण पक्षात मोठ्या संख्याने प्रवेश करीत आहे. आता या युवकांनी पक्ष संघटनेबरोबर महत्वाची पदे मिळविण्यासाठी पक्षात असलेल्या रिक्त जागा भरू काढल्या पाहिजेत. आज पक्षाला मोठे भवितव्य आहे. गुळवे यांच्या सारख्या युवकांनी सर्वसामन्यांचे प्रश्‍न सोडून त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येयधोरण पोहचविण्याचे काम केले पाहिजे.

गुळवे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी दिलेल्या संधीचे सोने करून पक्ष संघटना वाढविण्याचा प्रयत्न करणार.गाव तेथे काँग्रेस हे अभियान जोमाने राबविण्यात येईल.

यावेळी आमदार लहु कानडे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, प्रदेशचे पदाधिकारी दीप चव्हाण, शहराध्यक्ष किरण काळे, संदिप म्हस्के आदींनी गुळवे यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!