युवतींचे पथनाट्याद्वारे सार्वजनिक स्वच्छतेचे प्रबोधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन ना गंदगी करेंगे, ना गंदगी करणे देंगे! हा कानमंत्र देऊन संपूर्ण भारतात स्वच्छता मोहिम राबवली. या उद्देशातून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन यशस्विनी महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रिती औटी यांनी केले.
शहरातील पंचशीलनगर बोरुडे मळा येथे अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरु युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य व यशस्विनी महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने स्वच्छता व मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी औटी बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, डॉ. अमोल बागुल, डॉ. धीरज ससाणे, आरती शिंदे, रजनी ताठे, निकिता वाघचौरे, मंगल सोनवणे, शाहिर कान्हू सुंबे, अ‍ॅड. सुनिल तोडकर, भारती शिंदे, पोपट बनकर, विनायक नेवसे, सुदर्शन औटी आदी उपस्थित होते.

प्रारंभी स्वच्छता अभियान व मतदार जागृतीवर सपना रणखांब, शिल्पा गायकवाड, वैष्णवी भागवत, मनीषा कैदके, अनुजा मुंढे, पुनम साळुंके आदींनी पंचशीलनगर, बोरुडे मळा येथे पथनाट्य सादर करून सार्वजनिक स्वच्छता व मतदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. अ‍ॅड. भानुदास होले यांनी राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकार पैकी मतदानाचा मुलभूत अधिकार मतदारांनी बजावला पाहिजे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेत युवा व महिलां-युवतींनी सक्रिय सहभागी झाले तर सुदृढ लोकशाहीचे निर्मिती होणार असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे व मतदार दूत डॉ. अमोल बागुल यांनी मतदार जागृतीवर मार्गदर्शन केले. आभार अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!