युवा पिढीने उर्दू साहित्यामध्ये पुढे येण्याची गरज – मन्सूर शेख

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजेळा देत मुशायरा रंगला

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

उर्दू साहित्य व भाषेसाठी कार्य करणार्‍या जुन्या काळातील काही लोक राहिलेले असून, तेच थोडे फार काम करत आहे.पण हा वारसा पुढेही चालावा यासाठी युवा पिढीने उर्दु साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषद नाशिकचे विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी केले.

अदबे इस्लामी व मखदुम सोसायटीच्या वतीने जुन्या काळातील अहमदनगर येथील उर्दु कवी व साहित्यकार हिम्मत अमीर अहमदनगरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त एका शाम हिम्मत अहमदनगरी के नाम व्दारे महेफिले मुशायराचे आयोजन करण्यात आले होते.

या मुशायराच्या उद्घाटनाप्रसंगी मन्सूर शेख बोलत होते. ज्येष्ठ कवी कमर एजाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन युनूसभाई तांबटकर, दादू सुबेदार, समी सर, मुश्ताक अहमद, मंजुर पेंटर आदी उपस्थित होते.

मन्सूर शेख पुढे म्हणाले की, आज नगर येथे जुन्या काळातील उर्दू साहित्यकांना लोक विसरले आहे. अश्या वेळी मखदुम सोसायटीने एक जुन्या दिवंगत कवीच्या स्मरण ठेवणे, ही एक नव्या युगाची सुरुवात आहे.

हे कार्य सतत पुढे सुरु राहण्याची अत्यंत आवश्यकता असून,नवीन पिढीला जुन्या इतिहासाबरोबरच तंत्रज्ञानाच्या युगात उर्दू साहित्यिक फार मागे पडले आहेत.हा साहित्यीक मागासलेपणा युवा पिढीने पुढाकार घेऊन संपवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मुशायरार्यामध्ये हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजाळा देतांना मुन्नवर हुसेन यांनी मझधार ने दामन थाम लिया… कश्ती से किनारा छूट गया…मरने कि दुवाएं करते है… जिने का सहारा छुट गया…!, मरने पे तुम्हारे ऐ हिम्मत ! अपने तो तडपते ही होगें.. अहेबाब कहेंगे रो-रो कर.. एक साथी हमारा छुट गया…! अशा अनेक रचना सादर करुन त्यांच्या कवितेचे वाचन केले.आबीद खान यांनी जुन्या काळातील कविंचे संग्रह करण्याचे कार्य ते करत असल्याचे नमूद केले.

यावेळी नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून आलेल्या एजाज कमर (औरंगाबाद), इरशाद वसीम (नाशिक), गुलाम फरीद (आकोट), अहमद औरंगाबादी, बिलाल अहमदनगरी, अर्क अहेमदनगरी, मुशताक सर, डॉ.कमर सुरुर, सैय्यद खलील, आसिफ सर, आदी कवींनी मुशार्यामध्ये रंगत भरली. वाह ऽ.. वाह.., बहोत खूब… क्या कहना… मुकुर्रर… इरशादच्या गजरात मुशायरा कार्यक्रम रंगला होता.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अदबे इस्लामी चे गुलाम फरीद यांनी तर सूत्रसंचालन मुन्नवर हुसेन यांनी केले. आभार मंजूर पेंटर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुश्ताक अहमद, आबीद दुलेखान, आमीर छोटेखान यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!