नगरकरांना अभिनेते वैभव मांगले आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या भेटीची संधी
अहमदनगर – मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार विजेते नाटक *संज्या छाया* या नाटकाचे नगर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8:00 वाजता नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात हा नाट्य प्रयोग होत आहे. अनामप्रेम संस्थेच्या अंध मुलींच्या निवासी वसतिगृहाच्या बांधकामाच्या मदतीसाठी हा प्रयोग ठेवला आहे. संज्या छाया नाटकाचे लेखन प्रतिथयश लेखक मा. चंद्रकांत दळवी यांनी केले आहे. या नाटकाला दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे लाभले आहे. प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले आणि अभिनेत्या निर्मिती सावंत यांच्या प्रमुख अभिनयात हे नाटक साकारले गेले आहे. तरी नगर शहर व जिल्ह्यातील नाट्य प्रेमींनी या नाटकाला हजेरी लावावी असे आवाहन डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ. रवींद्र सोमाणी, इंजि.अजित माने, उद्योजक संजय हरकचंद गुगळे, राजीव गुजर, निवृत्त सनदी अधिकारी नितीन थाडे, उद्योजक बाबूशेठ टायरवाले, नाट्यकर्मी अमोल खोले, सतीश लोटके, क्षितिज झावरे, इंजि.पायल गांधी यांनी केले आहे.
कोरोनानंतर नगर शहरात पहिल्यांदा नाट्यप्रयोग होत आहे. हे नाटक म्हणजे नाट्यरसिकांना दिवाळी भेट आहे. जेष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर एकाकी जीवन जगताना निराशेला तोंड द्यावे लागते. मुलांना वाढवताना पालकांच्या अनेक अपेक्षा मनात असतात. नेमक्या मुलांच्या भावना पालकांनी कशा समजून घ्याव्यात याची उत्तरे नाटक पाहताना मिळतात. कधी हसू तर कधी आसू ची अनुभूती नाटक पाहताना येते. हे नाटक रसिकांना हलके हलके मनोरंजन करताना विचार करायला लावणारे आहे.
या नाटकाचे रेडिओ पार्टनर म्हणून रेडिओ सिटी 91.1 आहेत. या नाटकाचे सोशल मीडिया पार्टनर आय लव नगर हे आहेत. तसेच या नाटकास एशियन नोबल हॉस्पिटल, श्रीराम मार्बल,डॉ.नरवडे हॉस्पिटल, श्रीराम कोटिंग कंपनी,रौनक कन्स्ट्रक्शन व इंटेरियर यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. या नाटकाची आयोजन समिती मध्ये डॉ.मेघना मराठे, अभय रायकवाड, दीपक बुरम, जे.आर.मंत्री, नरेंद्र बोठे, उमेश पंडुरे,विष्णू वारकरी,प्रतीक्षा मूनतोडे,पल्लवी मकासरे,माधवी सैदाणे हे काम पाहत आहेत.
अहमदनगर व पुणे जिल्ह्यात अनामप्रेम संस्था अंध-अपंग- मूकबधिर-अस्थिव्यंग गटातील दिव्यागांच्या पुनर्वसनासाठी काम करते. या नाटकाच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून अतिरिक्त 40 दिव्यांग मुलींच्या हॉस्टेलच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.तरी इच्छुकांनी या नाटकाच्या प्रवेशिका अनामप्रेम ,गांधी मैदान,अहमदनगर येथून घ्याव्यात. तसेच 14 ऑक्टोबर 2022 रोजी दिवसभर माऊली सभागृहात या देणगी प्रवेशिका मिळणार आहेत. देणगी प्रवेशिका घरपोच मिळण्यासाठी 9422220123/ 9011670123 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आलेय.